आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबिराची खरी गरज : दिलीप सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबिराची खरी गरज : दिलीप सातपुते

 आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबिराची खरी गरज : दिलीप सातपुते

माजी मंत्री कै. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना ससंर्ग विषाणुच्या काळामध्ये आरोग्य सेवेला अंत्यत महत्त्व आले आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबिराची खरी गरज आहे. वैद्यकिय सेवा दिवसेंदिवस महागड्या होत चालल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरच्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी सामाजिक संस्थानी व राजकीय पक्ष पुढे येऊन विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे. नगर शहर शिवसेना पक्षाच्या वतीने नेहमीच सकारात्म दृष्टीकोनातून सामाजिक बाधिलकी सोपासत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. माजी मंत्री कै. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरकिंना दिलासा देण्याचे काम केले आहे. प्रत्येक नागरिकांचे आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. या माध्यमातून होणारे आजार टाळता येतात. झालेल्या आजारावरती उपचार करून बरे होता येते. असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
माजी मंत्री कै. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त केडगाव शिवसेना व सिटीकेअर हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नागरीक मधुसुधन मुळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक विजय पठारे, नगरसेवक अमोल येवले, माजी महापौर भगवान फुलसौदर, नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर,नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, दीपक खैरे, नगरसेवक प्रशांत गायकवाड माजी नगरसेवक विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, अनिल लोखंडे, पारुनाथ ढोकळे, अशोक दहिफळे आयोजक डॉ. श्रीकांत चेमटे, रमेश परतानी आदीनाथ मेहर, संतोष डमाळे, आदी यावेळी उपस्थित होते.
नगरसेवक विजय पठारे म्हणाले की समाजामध्ये आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा मानली जाते. माजी मंत्री कै. अनिल राठोड यांनी नगर शहरातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करुन आपल्या कामाचा ठसा सर्वसामान्यांमध्ये उमटविला होता. नगर शहराला आपले कुटुंब मानून त्यांनी अहोरात्र काम करत होते. त्यांच्या कामाचा आदर्श आजच्या युवापिढीला प्रेरणादायी आहे. प्रत्येक घटकातील व्यक्तीला सोबत घेऊन समाजकारण केले. शहरामध्ये शिवसेनेचे ब्रीदवाक्य म्हणजे 80 टक्के समाजकारण व 200 टक्के राजकारण करण्याचे काम त्यांनी केले. असे ते म्हणाले. डॉ. श्रीकांत चेमटे म्हणाले की, या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मोफत लाभ मिळणार आहे. माजी मंत्री अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष आम्ही केडगावमध्ये शिवसेना पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here