महावितरणविरोधात भाजपचा हल्लाबोल व ठिय्या आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

महावितरणविरोधात भाजपचा हल्लाबोल व ठिय्या आंदोलन

 महावितरणविरोधात भाजपचा हल्लाबोल व ठिय्या आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः महावितरणने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे. वास्तवामध्ये महावितरण कडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले कोरोना काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, रोजी सकाळी 11.00 वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ॠॠहल्लाबोल व ठिय्याॠॠ आंदोलन करण्यात येणार आहे.
   तालुक्यातील शेतकर्‍यांचे व व्यावसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, अंबादास औटी, संजयकुमार शेळके, उमेश बोरुडे, महेश क्षिरसागर, योगेश सावंत, संदिप कोकाटे यांनी समस्त जनतेच्या वतीने दिले. अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment