वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्याची मागणी

 वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पाथर्डी-राहुरी तालुक्यातील 43 गावांमधील 105 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सरपंच अमोल वाघ, राष्ट्रवादी युवकचे नेते अजय पाठक, युवानेते जालिंदर वामन, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी, गणेश पालवे, बाबासाहेब बुधवंत, चेअरमन संतोष गरुड ,युवानेते रवींद्र मुळे, अशोक टेमकर, देवेंद्र गीते, शिवसेनेचे तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, उपतालुकाप्रमुख भारत वांढेकर यांनी केली आहे.
   पाथर्डी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक ग्रामपंचायती महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असल्याने मंत्री तनपुरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होत आहे. पाथर्डी तालुका दौर्‍यावर आलेले मंत्री तनपुरे यांच्याकडे मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वांबोरी चारीला पाणी सोडल्यामुळे या भागातील लाभधारक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here