श्रीराम मंदिरासाठी श्रीरामकृष्ण पतसंस्थेतर्फे एक दिवसाचे वेतन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

श्रीराम मंदिरासाठी श्रीरामकृष्ण पतसंस्थेतर्फे एक दिवसाचे वेतन

 श्रीराम मंदिरासाठी श्रीरामकृष्ण पतसंस्थेतर्फे एक दिवसाचे वेतन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानास नगर जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. श्रीरामकृष्ण पतसंस्थेतर्फे या अभियानासाठी निधी धनादेश देण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सर्व कर्मचार्यांनी त्यांचे  एक दिवसाचे  वेतन  निधी देण्याचा निर्णय घेत 13,151 र.चा धनादेश गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला.
   याच वेळी उपस्थित संचालक  जगदीश दरक यांनी स्वत: उस्फुर्ततेने  11,000 रु.धनादेश दिला. यावेळी व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक,कुमार आपटे व सर्व कर्मचारी  उपस्थित होते.
   यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले की, डोंगरे महाराजाच्या कृपा आशीर्वादाने सुरु झालेली श्रीरामकृष्ण पतसंस्थेतील सर्व संचालक व परिवाराचे कार्याचा आदर्श घेत कर्मचारीही प्रेरणा घेऊन समाज कार्यात सहभागी होतात हि कौतुकास्पद गोष्ट असून समाज कार्याला गती देणारी आहे. संस्थेच्या  प्रगतीत  कर्मचार्‍यांच्या योगदानाचे महत्व आहे हे यामुळे दिसून येते.
   रामकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत म्हणाले की, संस्थेचे कर्मचारीअत्यंत प्रामाणिक पणे कार्यरत असून पतसंस्थेचे हित जोपासत सेवा देतात. संस्थेच्या सर्वच कार्यात परिवार म्हणून सहभाग घेतात.त्यांनी दिलेला एक दिवसाचा निधी आम्हालाही प्रेरणा देणारा आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण निधी समर्पण अभियानासाठी  श्रीरामकृष्ण पतसंस्थेतर्फेच्या सर्व कर्मचार्यांनी त्यांचा एक दिवसाचे वेतन  निधी 13,151 र.चा धनादेश गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कडे सुपूर्द केला.
   याच वेळी उपस्थित संचालक  जगदीश दरक यांनी स्वत: उस्फुर्ततेने  11,000 रु.धनादेश दिला.यावेळी व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक, कुमार आपटे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment