कुकडी कारखाना बचाव सर्वपक्षीय कृती समितीची बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 23, 2021

कुकडी कारखाना बचाव सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

 कुकडी कारखाना बचाव सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कुकडी कारखाना उभारणीसाठी 12 हजार 138 लोकांनी बँकेचे व्याज भरून व घरातील दागिने मोडून शेअर्स खरेदी करत कारखाना उभारणीस हातभार लावला मात्र कारखाना व्यवस्थापनाने कारखाना उभारणीसाठी योगदान असणार्‍या 5 हजार 144 सभासदांचे सभासदत्व रद्द करत मर्जीतील नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांची सभासदत्व ठेवून कारखान्याचा प्रशासनाने खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परीषद सदस्य दिनकर पंदरकर यांनी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळगाव पिसाच्या होणार्‍या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.17 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कुकडी कारखाना बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केले. कारखान्याचे विद्यमान संचालक बाजीराव मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
   कुकडी कारखान्यातील बोगस सभासदांची नावे उघडकीस आणून दिल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांनी 596 बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द केलेले आहे. कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रात नसणारे, ऊस उत्पादक नसणारे व बिगर सभासद यांना कोट्यवधीचे डव्हान्स वाटप केले आहे. तसेच प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने सध्या कारखाना प्रचंड तोट्यात असून डबघाईला आलेला आहे. कारखान्यांमध्ये शैक्षणिक पात्रता नसलेले जवळचे नातेवाईक व मर्जीतील लोकांना महत्त्वाच्या नोकर्‍या प्रदान केलेल्या आहेत. सदरील कारखाना फक्त नावापुरताच सहकारी असून एकाच कुटुंबाची खाजगी मालमत्ता म्हणून कारखान्याचा वापर चालू आहे. असे माजी जिल्हा परीषद सदस्य दिनकर पंदरकर यांनी सांगीतले.
   कुकडी कारखाना हा सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या घामाच्या पैशाच्या योगदानावर उभा केलेला असल्याने कार्यक्षेत्रातील कामधेनु वाचवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक होऊन आगामी होणारी कारखाना निवडणूक सर्वशक्तीनिशी लढणे बाबत चर्चा झाली. या बैठकीस कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील प्रमुखांसह अनेक ऊस उत्पादक सभासद शेतकरी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड. बाळासाहेब पवार यांनी केले तर मधुकर टकले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here