विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 23, 2021

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई

 विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई

बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे हे हजर झाल्यापासून अवैध धंद्यावाले व गुन्हेगारावर वचक बसविला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्याचे कौतुक होत आहे.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनामास्क फिरणार्‍याच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चिंभळा चौक, बेलवंडी एसटी स्टँड , शिरूर रोड, बेलवंडी फाटा, गव्हाणेवाडी ,या ठिकाणी जनजागृती करत धडक कारवाई सुरू केली.
   बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी श्रीगोंदा तालुक्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठीक ठिकाणीं तसेच बस स्थानक परिसर, महाविद्यालये, शाळा परिसरात जनजागृती करत विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहरात विना मास्क फिरणार्‍या 100 नागरिकांकडून सुमारे 10 हजार रूपये दंड आकारणी करत त्यांना मास्क, सेनेतायझर, तसेच सोशल दिस्टांस ठेवण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here