कोरोना व महागाईच्या काळात रुग्णसेवेचे व्रत जोपासले जावे ः डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

कोरोना व महागाईच्या काळात रुग्णसेवेचे व्रत जोपासले जावे ः डोंगरे

 कोरोना व महागाईच्या काळात रुग्णसेवेचे व्रत जोपासले जावे ः डोंगरे

निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः महागाईच्या काळात डॉक्टरांनी सामाजिक भावनेने कार्य केल्यास सर्वसामान्यांना आधार मिळेल. सर्वसामान्यांना अद्यावत आरोग्यसुविधा मिळण्यासाठी विविध शिबीर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोनाचे संकट व महागाईचा भडका उडाला असताना रुग्णसेवेचे व्रत जोपासण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले.
   आनंदऋषीजी नेत्रालय, मिशन इंडिया टीम, निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी पै. डोंगरे बोलत होते. यावेळी डॉ. दिलीप भालेराव, डॉ. विजय जाधव, सौ.जगताप, पै.अनिल डोंगरे, डॉ. सजिदा शेख, सुमन जगताप, सावली भालेराव, साधना बडवे, एकनाथ जाधव, साहेबराव जाधव, बाबा खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
    गावातील नवनाथ मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या शिबीरात गावातील ग्रामस्थांसह ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबीरास ग्रामस्थांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. दिलीप भालेराव यांनी आनंदऋषीजी नेत्रालय सेवाभावाने कार्य करत असून, गावागावात जाऊन आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती केली.

No comments:

Post a Comment