जिल्हा परिषद सदस्य, सदाशिव पाचपुते यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

जिल्हा परिषद सदस्य, सदाशिव पाचपुते यांचे निधन

 श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील ‘किंगमेकर’..

जिल्हा परिषद सदस्य, सदाशिव पाचपुते यांचे निधन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः काष्टी जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भिकाजी पाचपुते ( वय 66 ) यांचे अल्प आजाराने शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले.
   सदाशिवराव पाचपुते यांचे मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. सदाशिव पाचपुते श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील किंग मेंकर होते. बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाचे ते आधारवड होते. सदाशिव पाचपुते यांच्या निधनाचे वृत्त समजताच श्रीगोंदा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment