पैशासाठी आजीकडून नातवाचं किडनॅपिंग ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

पैशासाठी आजीकडून नातवाचं किडनॅपिंग !

 अमरावतीच्या ‘नयन’चे अपहरण... गुन्हे शाखेकडून मास्टरमाईंड जेरबंद...

पैशासाठी आजीकडून नातवाचं किडनॅपिंग !
मानवी नात्यांची लक्तरे वेशीवर , ‘ते’ ‘नयन’ला मुंबईला नेवून मागणार होते खंडणी?

अहमदनगर- अमरावती शहरातील ‘नयन’ या चार वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अमरावती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी अमरावती शहरातील सीसीटीव्ही फुटेज चे आधारावर व अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपास कामी उपयोगात आणलेले खबर्‍यांचे नेटवर्क व नगर तालुक्यातील जखणगाव मधील ग्रामस्थांनी आरोपींना पकडण्यासाठी केलेली मदत .या थरारक किडनॅपिंग प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींमुळे एका महत्त्वाच्या प्रकरणातील धागेदोरे उकलले गेले.


नयन मुकेश लुनिया वय चार वर्ष रा. अमरावती या आजी सोबत फिरायला गेलेल्या मुलाचे एका मोटारसायकल वरून अनोळखी महिला व पुरुषाने पळवून नेल्याची घटना अमरावती शहरात घडली.नी त्याचा शेवट मात्र नगरतालुक्यातील जखणगाव मध्ये झाला. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जखणगाव ग्रामस्थांना किडनॅपर नगर-कल्याण रस्त्यावरून गेले असल्याची माहिती दिली. जखणगाव ग्रामस्थांनी रस्त्यावर कडे करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला .तेव्हा आरोपीने पुन्हा नगरकडे पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वेळी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जखाणगाव पर्यंत पोहोचले व त्यांनी आरोपींना पकडले. हिंदी चित्रपटाला लाजवेल अशा थरारक नाट्याने या किडनॅपिंगचा शेवट झाला.
    ही धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी माहिती मिळताच संपूर्ण शहर पोलिस दल शहराच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत अधिक गतीने तपासाची चक्रे फिरविली परिसरातील सीसी टीव्ही फुटेज चेक केली.अपहरण केल्यानंतर आरोपी नयन ला रवीनगर परिसराकडे घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसुन आले. अपहरणकर्त्यानी रवीनगर परिसरातील श्रीमाली कॉम्पलेक्स समोर दुचाकी सोडून ऑटो मधून वेलकम पाईंट गाठले होते त्याच आधारावर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली व पुणे मुंबई च्या दिशेने रवाना केली तसेच तांत्रीक पद्धतीने हि तपास सुरु केला. यात पोलिसांना यश आले व काल सकाळी अहमदनगर मधून पोलिसांनी नयन ला सुखरूप ताब्यात घेतले. नयनचे अपहरणचा मास्टर माईंड तिची आजी असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या अपहरण प्रकरणी खंडणीचेच कारण पुढे आले आहे. अपहरणामध्ये अजुन किती आरोपी सहभागी आहेत ? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरणीत आहेत मात्र अमरावती पोलीस व शहराच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी केलेल्या तपासाबाबत शहरातील नागरिक आंनदी असून पोलीस प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे. पोलिसांचे एक पथक नयन व आरोपी घेऊन अमरावती कडे रवाना झाले आहे.दोन दिवसांपूर्वी अमरावतीहू नयनला पळवून आणले होते व कल्याणला नेऊन त्याच्या नातेवाईकाकडून खडणी उकळण्याचा अपहरणकर्त्यांचा इरादा होता. पण अमरावती पोलिसांची सजगता व अहमदनगर पोलिसांची धाडसी शोध मोहीम फत्ते झाली व नवीनची सुखरूप सुटका होताना त्याला पळवणारे 5 जणही जेरबंद झाले. अहमदनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल अमरावतीच्या लुनिया परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
   नेमके कोणत्या कारण्यासाठी हे अपहरण केले, याचा पोलिस शोध घेत आहेत.या बालकाच्या आजीनं अपहरणाचा कट रचल्याचे समजते. आता अमरावतीचे पोलीस त्याचा छडा लावणार आहेत. अहमदनगर पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय वर्ष 25, राहणार कोठला, अहमदनगर), असलम ताहीर शेख (वय 18, राहणार कोठला, अहमदनगर), मुसाहिब नासिर शेख (वय 21, राहणार मुकुंदनगर, अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (वय 24, राहणार कोठला, अहमदनगर), फैरोज रशीद शेख (वय 25, राहणार कोठला, अहमदनगर) यांचा यामध्ये समावेश आहे.
   सदर घटनेची हकीकत अशी की, मोनिका लुनिया (राहणार अमरावती) यांचा नातू नवीन (वय 4) याला फिरायला घेऊन गेले असता, एका मोटरसायकलवरून आलेल्या एका अनोळखी महिला व पुरुष यांनी नवीन यास पळून नेले. याबाबत अमरावती पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती अमरावती पोलिसानी अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिल्यानंतर अधीक्षक पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तात्काळ तीन वेगवेगळी पथके अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पाठवलेली होती. एका बातमीदाराकडून सदरचा गुन्हा हिना शेख व मुसाहिब शेख यांनी मिळून केला असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यादृष्टीने तपास सुरू केला. या प्रकरणांमध्ये हिना शेख, असलम शेख व मुसाहिर शेख यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. चौकशीमध्ये अपहरण केलेला मुलगा आसिफ शेख व फैरोज शेख यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पथकाने नगर शहर व परिसरामध्ये त्याचा शोध घेतला. नगर कल्याण रोडवरून ते बाळजाला घेऊन कल्याणच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका मोटारसायकलवरून अपहरण झालेल्या मुलास घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना जखणगावच्या ग्रामस्थांच्या मदतीने मुलास ताब्यात घेतले.
   स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गणेश इंगळे, मन्सूर सय्यद, दत्तात्रय इंगळे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, भाग्यश्री भीटे, सोनाली साठे, विजय धनेधर, रोहित येमुल, सागर ससाने, योगेश सातपुते, जालिंदर माने, मयुर गायकवाड, कमलेश पाथरूट, बबन बेरड, शरद बुधवंत तसेच अमरावती शहर पोलीस ठाण्याचे कृष्णा मापारी व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून ही कारवाई केली आहे. येथे पकडलेल्या आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या आरोपींना अमरावती पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, ते पथक अमरावती कडे रवाना झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here