कर्जत वैद्यकीय क्षेत्र हादरले, मूल व पत्नीला दिले इंजेक्शन? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

कर्जत वैद्यकीय क्षेत्र हादरले, मूल व पत्नीला दिले इंजेक्शन?

 कर्जत वैद्यकीय क्षेत्र हादरले, मूल व पत्नीला दिले इंजेक्शन?

डॉक्टरांची पत्नी व मुलांसह आत्महत्या.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

राशीन ः कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी खळबळजनक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली आहे. या प्रकाराने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राशीन येथील नामांकित व सर्वात जास्त रुग्णांना सेवा देऊन लोकांच्या गळ्यातील ताईत असलेले डॉ महेंद्र जालिंदर थोरात (वय 47) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय 41), याचे सह दोन मुले कृष्णा (वय 16) व कैवल्य (वय 6) हे तिघेही घरात मृत अवस्थेत आढळले आज सकाळी डॉक्टराना अनेक फोन करूनही त्याचे कडून प्रतिसाद मिळत नसल्याने कंपाउंडर व इतर लोक त्याचे घरी पोहचले दार वाजवले मात्र तरीही दार उघडले न गेल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दार तोडून घरात प्रवेश केला असता अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले. ही घटना काल रात्री घडली असून याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ दिवटे, यांनी भेट देऊन पाहणी केली ही घटना कळताच अनेकांनी डॉ थोरात यांच्या श्रीराम हॉस्पिटल कडे धाव घेतली या अकस्मात दुर्घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून वैद्यकीय क्षेत्रामुळे सर्वांच्या संपर्कात असलेल्या डॉ थोरात यांनी असे का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
    या घटने बाबत राशीन येथील नवीन रसिकलाल बोरा यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली असून त्यात म्हटले आहे की हॉस्पिटलच्या खाली असलेल्या मेडिकलवाले निलेश मुथ्था यांचा सकाळी 10:20 वा फोन आला ते म्हणाले डॉक्टर सकाळ पासून दार उघडत नाहीत दरम्यान महादेव जगताप यांचाही निरोप आला. आम्ही इतर लोकां सह सर्वजण धावत डॉक्टर थोरात यांचे घराकडे गेलो. दार उघडले नाही म्हणून मग दार तोडून आत गेलो असता एका खोलीत डॉ लटकलेल्या अवस्थेत आढळले, आम्ही त्वरित ही बाब
पोलिसांना कळवली. पोलीस या ठिकाणी आले, तोपर्यत कोठेही हात लावला नाही आम्ही अनेक जण यावेळी अनेक जण उपस्थित होतो. त्यांनी स्लॅबच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. खोलीत लहान मुलगा पलंगावर होता तर ते मॅडम व मोठा मुलगा खाली झोपलेल्या अवस्थेत होते.   याठिकाणी खोलीच्या दरवाजाला पांढरी चिकटपट्टी  लावलेली एक चिठ्ठी ही पहावयास मिळाली. पोलिसांनी सांगितले नंतर आम्ही डॉ थोरात यांचे शरीर खाली घेतले. डॉ थोरात हे अत्यंत मितभाषी होते प्रत्येकाला मदत करणारे, अडचणीतील व्यक्तींना आधार देणारे, प्रत्येक व्यक्तीला मोटिव्हेट करणार्‍या व्यक्तीने असा निर्णय का घेतला असे न सुटणारे कोडे आहे, असे नवीन बोरा म्हणाले.
   डॉ. थोरात हे कोमल ह्रदयाचे ग्रहस्थ होते. त्यांच्या थोरल्या मुलाला ऐकायला कमी येत होते. त्याला समाजाकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळायची, यामुळे ते दाम्पत्य व्यथित होते. तो मुलगा अकरावीला आहे. पत्नीच्या मदतीने जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुसाईडनोटमध्ये आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
   ते गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात. सकाळी पेशंट त्यांच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सामाजिक कामात अग्रेसर असलेला माणूस नेमके असे कसे काय करू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी व दोन मुलांना इंजेक्शन देऊन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा आहे. पोलिस या घटनेबाबत सखोल तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment