ढोरजा व बांगर्डे गावचा विकास होणार राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

ढोरजा व बांगर्डे गावचा विकास होणार राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून

 ढोरजा व बांगर्डे गावचा विकास होणार राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला असून सरपंच पदांची निवड झाल्यानंतर मनसेच्या बांगर्डे येथील नवनियुक्त सरपंच संजय शेळके व ढोरजे येथील अमोल कोहक या दोन सरपंचांनी थेट कृष्णकुंज गाठुन आपल्या राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन नवनिर्माणासाठी पाठबळ मागितले. यावेळी पक्षाचे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल कोठारे यांच्या सह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तुम्ही तुमच्या गावात केलेली विकासकामे पाहून इतर गावांना हेवा वाटेल असे गावं घडवा.त्यासाठी लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिल. त्याच बरोबर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक पक्षाचे नेते प्रवक्ते अनिल शिदोरे यांची थेट या दोन्ही ग्रामपंचायतींवर मार्गदर्शक म्हणुन नियुक्ती केली. या गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा असा आशिर्वाद दिला. यापुढे सतत संपर्कात रहा. तुम्हाला यापुढे विकासकामांसाठी काही सामाजिक संस्थांकडुन मार्गदर्शन मदत मिळऊन देण्याचेही अश्वासन यावेळी दिले.
   यावेळी नितिन सरदेसाई,अभिजीत पानसे,अनिल शिदोरे, संदिप देशपांडे,सुमित खांबेकर,प्रकाश महाजन ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदींनी सर्वांचे अभिनंदन केले व भविष्यात विकासकामांसाठी मदतीचे अश्वासन दिले. यावेळी अतुल कोठारे, ढोरजा ग्रामपंचायत सदस्य अनिल वानी,अनिल टकले,मेजर रजनिकांत कोठारे, सचिन गावडे संदिप ठवाळ आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment