सर्व गटाच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा मिरी येथे एकत्रित सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

सर्व गटाच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा मिरी येथे एकत्रित सत्कार

 सर्व गटाच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा मिरी येथे एकत्रित सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

मिरी  ः  पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुमारे चार गटांनी स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवून निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत आणली होती.यामध्ये एकूण पंधरा सदस्यांच्या जागेसाठी सुमारे पंचेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यामुळे मिरी गावचे राजकारण चांगलेच तापल्याची चिन्हे दिसत होती.परंतु मिरी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अशोकराव झाडे व त्यांचे बंधू ह.भ.प. आत्माराम झाडे महाराज या कुटुंबाने गावातील सर्व गट-तट विसरून सर्व गटाच्या पॅनल प्रमुख व विजयी तसेच पराभूत उमेदवारांना एकत्रितरीत्या आमंत्रित करून आपल्या घरी यथोचित सत्कार करून मिरी गावात राजकीय मेळ जुळवण्याचा प्रयत्न केला आहे .या अनोख्या उपक्रमाचे मिरी व पंचक्रोशीतून अनेक नागरिकांनी कौतुक केले असून अशोक झाडे यांच्या मनोमिलनाच्या कार्यक्रमामुळे मिरी गावातील राजकारणातील संघर्ष कमी होणार का हे पुढील काळात कळणार आहे.
    या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,माजी पंचायत समिती सदस्य महादेव कुटे,पोपटराव गवळी,नवनिर्वाचित सरपंच कमलताई सोलाट,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी,विकास मिरपगार,संदीप नरवडे,शशिकांत सोलाट,अमोल पाटील,आदिनाथ झाडे ,संजय शिंदे,संभाजी झाडे,जालिंदर गवळी,एकनाथ गवळी,आण्णा पाटील शिंदे,आदिनाथ वनारसे,आदिनाथ सोलाट,अशोक शिंदे,रमेश डफळ यांच्यासह विजयी व पराभूत उमेदवार तसेच पॅनल प्रमुख यांचा झाडे कुटुंबाकडून सत्कार करण्याचा आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here