सराटे वडगाव ला स्मार्ट ग्राम योजनेतून जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

सराटे वडगाव ला स्मार्ट ग्राम योजनेतून जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक

 सराटे वडगाव ला स्मार्ट ग्राम योजनेतून जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक

सरपंच प्रा. डॉ. राम बोडके,उपसरपंच महादेव शिंदे,ग्रामसेवक गोवर्धन सांबर, आणि ग्रामस्थांनी एकोपा दाखवत मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे. स्वच्छ गाव आणि सुंदर गाव याप्रमाणे ग्रामस्थांनी गाव स्वच्छ राहावे आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गेल्या वर्षभरापासून मेहनत घेऊन या स्पर्धेत तालुकास्तरीय पहिले बक्षीस पटकावले आहे. आणि जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक सुद्धा पटकावला आहे.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः माजी मुख्यमंत्री आर आर बाबा पाटील यांच्या नावाने राज्य शासनाने सुरू केलेल्या आर आर पाटील स्मार्ट ग्राम योजनेचे सराटे वडगावला तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आणि परत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला.
   जिल्हास्तरीय स्पर्धेत धारूर तालुक्यातील अरणगाव या गावाने 84 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सराटे वडगावला 71 गुण मिळाले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत दुतिय क्रमांक.आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव आनंदवाडी ग्रूप ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय निवड झाली होती.या गावाने आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता.या गावातील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून गावात वेगवेगळ्या योजना राबवल्या.

No comments:

Post a Comment