विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे ः भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे ः भोसले

 विमानतळालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे ः भोसले

विमानतळ परिसर व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी

शिर्डी ः सुरक्षेला प्राधान्य देत शिर्डी विमानतळ परिसरालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज अहमदनगर येथे केली.
   शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी परिसर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एम.आदेश रेड्डी, शिर्डी विमानतळ संचालक दीपक शास्त्री, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहीवाडकर, सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके उपस्थित होते.
    विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविधप्रकारची कार्ये निरंतर पार पाडण्यात येतात. ही सर्व कार्ये सुलभपणे पार पाडता यावी यासाठी, सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवावा. विमानतळ परिसरात बांधकाम नियंत्रणासाठी नगर विकास विभागाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. तसेच विमान उड्डाण व उतरण्यासाठी बाधा पोहोचू नये यासाठी बॅनर्स उभारणी करण्यास मनाई करतानाच ग्राम पंचायतींनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठराव करावा असे सांगितले. कचरा संकलन व विल्हेवाट करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. जिल्हयातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्हयाची माहिती दर्शविणारे  फलक विमानतळ परिसरात उभारणे, पोलीस चौकी स्थापन करण्याबाबत बैठकीत निश्चित करण्यात आले.
   विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी मागील बैठकीतील ठराव व  प्राधिकरणाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी नगर पंचायत आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
     बैठकीला शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, साई संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बी. बी. घोरपडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके,राहाता गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, कोपरगाव गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, राहाता तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here