सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी दहशतीने जागा बळकावत असल्याचा आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी दहशतीने जागा बळकावत असल्याचा आरोप

 सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी दहशतीने जागा बळकावत असल्याचा आरोप

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
दहशतीने आदिवासी बांधवांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्यांवर  कारवाई करण्याच्या मागणीसह आंबी खालसा (ता. संगमनेर) येथील पिडीत आदिवासींना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने काळीआई ताबा पडताळणी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
    आंबी खालसा येथील गट नं. 479 व 484 मध्ये नाथा गावडे, पुन्हाजी गावडे व शिवाजी गावडे हे तिन्ही भाऊ व त्यांचे दोन पुतणे सुभाष व राजेंद्र गावडे यांच्या ताब्यातील 15 एकर जमीनी मधील पाच एकर जमीनीचा ताबा गावातील सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी असलेल्या दोन्ही भावांनी दहशतीने घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. गावडे यांचे शेजारी असलेले अण्णासाहेब मते, बाळासाहेब मते व अरुण मते यांच्या जमीनीतील अडीच एकर जमीन देखील घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सदरील सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्यांनी भ्रष्टाचाराने कोट्यावधीची संपत्ती कमवली आहे. तर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर अनेक जमीनी घेतल्या असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.आदिवासी बांधवांच्या शेतजमीनीत डाळिंब बाग व गव्हाचे उभे पिक असताना कायदा हातात घेऊन सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या जमीनीवर दहशतीने कब्जा प्रस्थापित करु पाहत आहे. तसेच मते यांच्या जमीनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदिवासी बांधवांची जमीन दहशतीने बळकावणार्यावर कारवाई करुन पिडीतांना न्याय मिळण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी व संगमनेर प्रांत व तहसिलदारांना पाठविण्यात आले आहे.
    आंबी खालसा येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये दि. 14 मार्च रोजी काळीआई ताबा पडताळणी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment