टाकळीमियाँच्या सरपंच, उपसरपंचांचा आ. लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

टाकळीमियाँच्या सरपंच, उपसरपंचांचा आ. लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार

 टाकळीमियाँच्या सरपंच, उपसरपंचांचा आ. लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः जिल्हा परिषद टाकळीमिया गटातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या हस्ते टाकळीमिया येथील महादेव मंदिरा मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टाकळीमिया गावचे लोकनियुक्त सरपंच श्री वेणुनाथ निकम होते.
   याप्रसंगी आमदार लहुजी कानडे साहेब यांनी भारतीय इतिहास समजावून सांगितला तसेच भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकर्‍यांवर अन्याय झाला त्याचा निषेध करून काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय देईल असे स्पष्ट केले तसेच सर्व गावातील सरपंचांनी मोठ्या भावाप्रमाणे माझ्याकडे गावच्या विकासासंदर्भात समस्या मांडाव्यात मला तीस वर्ष बीडीओ,उपमुख्यकार्यकारी, ग्रामविकास खात्याचे उपायुक्त पदाचा प्रशासनाचा अनुभव असून या कामी त्याचा निश्चितच उपयोग होईल व तुमच्या गावपातळीवर समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असेही त्यांनी सांगितले.नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी निःपक्षपातीपणे काम करावे असे आमदार लहुजी कानडे साहेब यांनी सांगितले
जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री कदम सर यांनी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांसाठी करत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन भाऊ गुजर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लाख दरडगाव मुसळवाडी मालुंजे चांदेगाव ब्राम्हणगाव भांड व चिंचोली इत्यादी गावचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच उपस्थित होते कार्यक्रमासाठी राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती ,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, मुसळवाडीचे सरपंच अमृत काका धुमाळ, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिनभाऊ गुजर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वरमाऊली मुरकुटे, गटविकास अधिकारी परदेशी साहेब,सरपंच वेणुनाथ निकम काँग्रेसचे बाळासाहेब सगळगिळे, सुधाकर शिंदे सर ग्रामविकास अधिकारी बेल्हेकर भाऊसाहेब, अरुण सोनवणे, सादिक शेख,सतिष धुमाळ, आदी मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here