डीपीडीसी निधीतून साकतखुर्द येथे अंगणवाडी बांधकामाचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

डीपीडीसी निधीतून साकतखुर्द येथे अंगणवाडी बांधकामाचे उद्घाटन

 डीपीडीसी निधीतून साकतखुर्द येथे अंगणवाडी बांधकामाचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा परिषदेच्या डीपीडीसी निधीतून नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे अंगणवाडी बांधकामाचे शनिवारी (दि.27) सकाळी  उदघाटन करण्यात आले.
   गावातील जेष्ठ नागरिक तथा पोलीस पाटील दत्तात्रय चितळकर तसेच भाऊसाहेब मुंगसे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजना राबऊन गावात विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे उपसरपंच बाबासाहेब चितळकर यांनी सांगितले.
   याप्रसंगी सरपंच बापू केदारे,   सेवा सोसायटी अध्यक्ष अशोक शिंदे, खरेदी विक्री संघांचे माजी संचालक सुभाष पवार, माजी सरपंच श्रीधर पवार, भाऊसाहेब निमसे, रावसाहेब निमसे, कारभारी वाघमोडे, माणिक शिंदे, संभाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य बापू निमसे, तात्या वाघमोडे, बापू वाघमोडे,  पांडुरंग शिंदे, अविनाश पवार, रामदास चितळकर, बाळू बेरड, विठ्ठल चितळकर, गोरख चितळकर, विश्वास पवार, अविनाश निमसे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment