आर. के. इंटेरियर अ‍ॅण्ड फर्निटेकच्या फॅक्टरी आऊटलेटचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

आर. के. इंटेरियर अ‍ॅण्ड फर्निटेकच्या फॅक्टरी आऊटलेटचे उद्घाटन

 आर. के. इंटेरियर अ‍ॅण्ड फर्निटेकच्या फॅक्टरी आऊटलेटचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  आपले घर. बंगला, निवासाची जागा असो किंवा व्यावसायिक प्रतिष्ठान ते अदयावत, सुसज्ज फर्निचरसह शोभुन दिसावे इतकेच नव्हे तर महिलांच्या दृष्टीकोनातुन आपले स्वयंपाकगृहसुध्दा नीट नेटक्या फर्निचरसह सजविले जाते. आणि यात मोलाचा हातभार लावणारे अंतर्गत सजावट कार (इंटेरियर डेकोरेटर)आग्रहाने आर.केआर.के.इंटेरियर अ‍ॅण्ड फर्निटेकच्या.  उत्पादनाची शिफारस करतात. कारण ही सारी उत्पादने स्वतः च्याच फॅक्ट्रीत निर्माण करुन आउटलेट मधुन विक्रीस उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना मोठा लाभ होईल असे उदघाटक महोदयांनी सांगितले.
    3 वर्षा पुर्वी नगर शहरात टिळक रोड वर आर.के. फर्निचरचे सुसज्ज दालन श्री.नितीन कूंकुलोळ परिवाराने सुरु केले. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. व आता संपूर्ण जिल्ह्याच्या ग्राहकाकडुन झालेल्या मागणीनुसार कूंकुलोळ व संकलेचा परिवाराने एम.आय.डी.सी परिसरातील रेणुका माता मंदिराजवळ, निंबळक रोड, येथे 40.000 स्क्वे फुटाचे प्रशस्त फर्निचर दालन सुरु केले आहे.त्याचा शानदार शुभारंभ   प्रख्यात उदयोगपती  प्रकाशजी धारीवाल यांच्या सुविदय पत्नी सौ.दिना धारीवाल व सौ.धनश्री सुजय विखे पाटील आणि सौ. शितल संग्राम जगताप, यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
    यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, उद्योगपती श्री.प्रकाशजी धारीवाल आमदार श्री.अरुणकाका जगताप व श्री.संग्राम जगताप, महापौर श्री. बाबासाहेब वाकळे, तसेच कृष्णा समुहाचे चेअरमन श्री.राजेंद्र मुथा व उद्योजक श्री.नरेंद्र बाफना यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला. आर.के.इंटेरीयर व फर्निटेकच्या या प्रशस्त दालनात घराच्या कानाकोपर्‍यापासून अतिभव्य कारखान्याच्या वास्तुत लागणारे फर्निचर ची उपलब्धी होईल. असे कूंकुलोळ व संकलेचा परिवाराने सांगितले. नितीन भाऊ व कृषी भुषण श्री.राजेंद्र कूंकुलोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व शांतीलाल संकलेचा यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here