महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागणार ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागणार ?

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागणार ?

कुलगुरूची ऑनलाइन मुलाखती पहिल्यांदी झाल्या आहेत. येत्या काही दिवसात समिती पाच किंवा तीन नावे राज्यपालांकडे पाठविणार आहेत. त्यानंतर राज्यपाल राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ पदी नाव डिक्लेअर करणार आहेत .त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राहुरीच्या कुलगुरू कोणाची वर्णी लागते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. कुलगुरू पदासाठी दोन दिवस 30 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या कुलगुरू नियुक्तीसंदर्भात तीन जणांची समिती नेमण्यात आली होती. समितीमध्ये हवामान शास्त्रज्ञ लक्ष्मण राठोड ,आय सी आय चे डायरेक्टर एके सिंग ,कृषी सचिव एकनाथ डवले यांचा समावेश होता.
    तीस जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यापैकी पाच किंवा तीन नावे राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहेत. राज्यपाल कोणाची शिफारस करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
    डॉक्टर के पी विश्वनाथा हे इतर राज्यातील कुलगुरू राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली होती. यंदा राज्याच्या बाहेरील कुलगुरू ची निवड होते की राज्यातील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment