नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर परिचय मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर परिचय मेळावा

 नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर परिचय मेळावा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सध्या सोशल मीडिया मध्ये व्हाट्सअप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अ‍ॅपचे कधी चांगले तर कधी वाईट परिणामही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाट्सअप थेट सोयरीक जमावण्यासाठी वापर करीत रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील संजोग लॉन्स येथे मराठा वधू वर थेट-भेट परिचय मेळावा आयोजित केला आहे.शेतकर्‍यांची मुले व मुलींसाठी तसेच उपवर वधू-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशाने जिजाऊ प्रतिष्ठाण व सकल मराठा सोयरीक फाउंडेशनचे व्हाट्सअ‍ॅप वर राजमाता जिजाऊ मराठा वधू- वर हा ग्रुप तयार केला या ग्रुपच्या माध्यमातून वधू- वर यांचे फोटो व बॉयोडाटा देवाणघेवाण सुरू झाली या माध्यमातून निवडलेल्या व आवडलेल्या अनुरुप  स्थळांना संबंधित पालकांनी संपर्क करून सोयरीक जमवल्या गेल्या सहा वर्षात आठराशे पेक्षा आधिक वधु-वरांची विवाह जमविल्या गेल्या व त्यांचे लग्नही मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडले आहेत.या मराठा  ग्रुप वर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांचा वाढता प्रतिसाद पाहून या ग्रुपचे डमिन व राजमाता जिजाऊ वधुवर मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ जगताप, माजी प्राचार्या रजनीताई गोंदकर, मराठा सोयरिक चे  बाळासाहेब वाकचौरे,  राजेश सरमाने,  लक्ष्मण मडके, धनंजय सांबारे, मायाताई जगताप, शितलताई चव्हाण, रोहिणीताई वाघमारे, नंदाताई वराळे ,संपदाताई ससे, आशाताई साठे,प्राजक्ताताई निक्रड, यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी मराठा वधू-वर मेळाव्याची संकल्पना मांडली या राजमाता जिजाऊ मराठा वधू- वर ग्रुप ला राज्यभरातील अनेक कार्यकर्ते व महिला एकत्र येऊन सर्वसामान्य शेतकर्‍यांचा व समाज बांधवाचा खर्च आणि वेळ वाचावा तसे त्यांची मुलं आणि मुलींसाठी घर बसल्या चांगल्या स्थळांची माहिती मिळावी या उद्देशाने राज्यभरात जिल्हा व तालुका निहाय ग्रुप तयार केले असून आता गाव निहाय ग्रुप तयार करून राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर मंडळाने समाज बांधवांच्या सहकार्‍यांनी सोशल डिस्टन चे पालन करुन मर्यादित वधू-वरांना प्रवेश देऊन रविवारी थेट-भेट मेळाव्याचे आयोजन. केले आहे या मेळाव्यातील नाव नोंदणी साठी 9130910999 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन राजमाता जिजाऊ मराठा वधु वर मंडळ व संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment