ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह

 ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह

नेवासा काँग्रेसकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

शेवगाव ः राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांचा 7 फेब्रुवारी हा जन्मदिवस. राज्यातील सत्तेच्या अग्रस्थानी असणार्‍या थोरात यांचा वाढदिवस  हा संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाने काँग्रेस बळकटीकरण सप्ताह म्हणून आयोजित करण्याचे ठरविले आहे.
   नेवासा काँग्रेस कमिटीने देखिल विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून ना.थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे, याशिवाय युवक काँग्रेसच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.कोरोना संकट काळात ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे त्यांना काँग्रेस पक्षाकडून  सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय नविनच सुरु झालेल्या शाळांना कोविड किटचे वाटप करण्यात येणार आहे.शेतकरी बांधवांसाठी तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.अपंग तसेच असंघटित कामगारांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी अपंग तसेच कामगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.काँग्रेस बळकटीकरणासाठी तसेच मजबूत, निडर काँग्रेस कार्यकर्ता घडविण्यासाठी तालुकास्तरीय काँग्रेस कार्यकर्ता केडर कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
   आजपासून सुरु होणार्‍या ना. थोरात यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या प्रारंभी तालुक्यातील माळीचिंचोरे येथील म.फुले माध्यमिक विद्यालयास नेवासा काँग्रेस कडून कोविड किट ,पाच लिटर  सॅनिटाईझ , स्टँड, ऑक्सिमिटर, मास्क, पेन यांचे वाटप करण्यात आले, यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, शहराध्यक्ष रंजन जाधव, जिल्हा सेक्रेटरी सुदमराव कदम, मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, सरचिटणीस प्रविण तिरोडकर, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, संघटक संदिप मोटे, कमलेश गायकवाड, रमेश जाधव, एनएसयुआईचे अध्यक्ष सौरभ कसावणे, समीर शेख, अक्षय फुगे, अभिषेक गायकवाड, अल्पसंख्याक विभागाचे सुरेंद्र मंडलिक, नंदू कडु, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
   यावेळीं विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकानी कोविड किट दिल्याबद्दल  काँग्रेस पक्षाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment