प्रा.डॉ. विशाल साळवे यांचे पुस्तक जर्मनीच्या प्रकाशन संस्थेने केले प्रकाशित ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

प्रा.डॉ. विशाल साळवे यांचे पुस्तक जर्मनीच्या प्रकाशन संस्थेने केले प्रकाशित !

 प्रा.डॉ. विशाल साळवे यांचे पुस्तक जर्मनीच्या प्रकाशन संस्थेने केले प्रकाशित !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील हंगा येथील भूमिपुत्र व पारनेर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असलेले डॉ. विशाल साळवे यांचे कोविड - 19 च्या लॉकडाऊन च्या काळात ’अमिताव घोष: ए स्टडी ऑफ इंडियन एथॉस इन सी ऑफ पोपइज’ पुस्तक जर्मनीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. मूळ इंग्रजी भाषेतील हे पुस्तक जगातील प्रमुख 8 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. ही बाब पारनेर तालुका व महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
   न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथील प्राध्यापक व ग्रामीण भागात राहूनही इंग्रजीचे  संशोधन करणारे डॉ.विशाल गुलाबराव साळवे हे पारनेर तालुक्यातील हंगा येथील शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांचे यापूर्वीही आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले 2 पुस्तके प्रकाशित आहेत.घरात कोणी साहित्यिक आणि इंग्रजीचा वारसा नसतानाही डॉ. साळवे यांना इंग्रजीची गोडी लागली.करोनाच्या काळात वेळ सत्कारणी लावत घरात बसून त्यांनी व त्याच्या पत्नी सौ. पौर्णिमा साळवे यांनी ‘अमिताव घोष: ए स्टडी ऑफ इंडियन एथॉस इन सी ऑफ पोपइज’ हे शीर्षक असलेले पुस्तक जर्मनीतील प्रकाशकाकडे पाठवले होते.सध्या हे पुस्तक जगातील प्रमुख रशियन, पौर्तुगीज,पॉलिश, डच,इटालियन, फ्रेंच,स्पॅनिश,जर्मन या 8 भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे.
    प्रसिद्ध भारतीय लेखक अमिताव घोष यांच्या लेखनातून राजकीय,सामाजिक व त्याबरोबरच स्वातंत्र्योत्तर भारताचे मूलभूत आणि गांभीर्याने चित्रण केलेले आढळते.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे तसेच विविध भाषा, संस्कृती,धर्म या सर्वांनी मिळून बनलेला देश तसेच त्यामागे दडलेले संदर्भ त्यामुळे त्यांचे वेगळे भारतीय संस्कृतीचे मूल्य दर्शनासाठी अध्यात्मिक, धार्मिक,तत्वज्ञान समानता भाषेचे वैविध्य,सामाजिक विविधता, लोकांचे भेटणे बोलणे, उत्सव साजरे करणे, कौटुंबिक व्यवस्था, जुन्या काळची राज्यव्यवस्था, स्त्रियांचे समाजातील स्थान हे अमिताव घोष यांच्या कादंबर्‍यांमध्ये कसे चित्रित केले आहे याचे लेखन, त्यावर आपले मत, विचार या पुस्तकांमध्ये डॉ. विशाल साळवे व सौ.पौर्णिमा साळवे यांनी मांडलेले दिसून येते.
   डॉ.साळवे यांचे आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले 2 पुस्तके प्रकाशित आहेत.सध्या ते रारूेप.लेा तसेच सर्व ऑनलाइन पुस्तके विक्री करणार्‍या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सध्या प्रकाशित झालेले पुस्तक व त्याचे 8 भाषांमधील अनुवादन ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांना आय.ए.एस.इ, चे संस्थापक डॉ. अशोक थोरात,डॉ. भाऊसाहेब जरांगे, प्रा.अशोक मोरे,डॉ. सचिन गाडेकर व इंग्रजी विभागातील सहकारी यांचे मार्गदर्शन,सहकार्य लाभले.
    एका ग्रामीण भागातील तरुणाचे आंतराष्ट्रीय स्तरावर संशोधन पोहचले व ते वेगवेगळ्या भाषेमधून अनुवादित होते यावरून ग्रामीण भागातील तरुणही संशोधन क्षेत्रात कमी नाहीत हे दिसून येते.
डॉ. साळवे यांच्या प्रकाशित ग्रंथाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार झावरे पाटील, मा. आमदार श्री. निलेशजी लंके, संस्थेचे  उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे पाटील, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment