नगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; 16 पदाधिकार्‍यांचा समावेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

नगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; 16 पदाधिकार्‍यांचा समावेश

 नगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; 16 पदाधिकार्‍यांचा समावेश

14 क्रीडा प्रकारांसह युवती खेळाडूंना देखील कार्यकारणीत स्थान

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मान्यतेने जाहीर केली आहे.
कार्यकारणी मध्ये 1 - समन्वयक, 2 - उपाध्यक्ष, 3 - सरचिटणीस, 2 - सचिव, 3 - सहसचिव, 1 - खजिनदार, 1 संघटक, 2 - कार्यकारणी सदस्य तसेच अध्यक्षांसह 16 पदाधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारणीमध्ये नगर मध्य शहर, सावेडी विभाग, केडगाव विभाग अशा सर्व विभागांना सामावून घेण्यात आले आहे. कार्यकारणी करताना फुटबॉल, तायक्वांदो, धनुर्विद्या, स्केटिंग, बॉक्सिंग, योगा, मल्लखांब, कराटे, खो-खो, सायकलिंग, बास्केटबॉल, थलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी अशा विविध 14 खेळांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावरती खेळणारे खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचा देखील कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कार्यकारणीमध्ये 1 युवती खेळाडू तसेच 1 महिला क्रीडा प्रशिक्षकांना देखील स्थान देण्यात आले आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : शहर जिल्हाध्यक्ष - प्रवीण गीते पाटील (कराटे, अथलेटिक्स, बॅडमिंटन), समन्वयक - अभिजीत आनंदा दळवी (धनुर्विद्या), उपाध्यक्ष - प्रदीप पाटोळे (स्केटिंग, बॉक्सिंग), उमेश झोटींग (योगा, मल्लखांब), सरचिटणीस - प्राजक्ता जयवंत नलावडे (सायकलिंग, योगा), हर्षल राजेंद्र शेलोत (बास्केटबॉल), सचिव - मच्छिंद्रनाथ बबन साळुंखे (तायक्वांदो,बॉक्सिंग), शुभांगी सुधाकर रोकडे-दळवी (धनुर्विद्या).
सहसचिव - आदिल सय्यद (कराटे), मुकुंद भगीरथ नेवसे (खो-खो), महेश भाऊसाहेब निकम (स्केटिंग), संघटक - प्रसाद भाऊसाहेब पाटोळे (फुटबॉल), खजिनदार - नारायण संपत कराळे (तायक्वांदो), कार्यकारिणी सदस्य - सुर्यकांत रामू वंगारी (बास्केटबॉल), गणेश तुळशीराम धोटे (बास्केटबॉल,फुटबॉल, हॉकी).
नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, मागासवर्गीय काँग्रेसचे अध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनीफभाई शेख, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष इंजि. चिरंजीव गाढवे, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष सौरभ रणदिवे आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here