महादजी शिंदे स्मृतीदिन श्रीगोंदा शहरात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

महादजी शिंदे स्मृतीदिन श्रीगोंदा शहरात साजरा

 महादजी शिंदे स्मृतीदिन श्रीगोंदा शहरात साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः मराठ्यांच्या इतिहासात अटकेपार झेंडा लावलेले पराक्रमी सेनापती महादजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या स्मारकातील पादुकांची तहसीलदार कार्यालयाचे वतीने नायब तहसीलदार डॉ योगीता ढोले ,श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कार्यालय अधिक्षक श्रीमती प्रियंका शिंदे , दिलीपराव पोटे यांचे हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी शिक्षण संस्थांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानदेव म्हस्के, मुख्याध्यापक बापुसाहेब जाधव, किशोर जामदार, प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिंदे घराण्याचे मूळ गाव कन्हेरखेडचे संभाजीराव शिंदे,सुहासराव शिंदे,दिलीराव शिंदे आदी मान्यवर खास करुन उपस्थित होते.
   पूजनासाठी पानीपतच्या भूमीतून आणलेली मृदा जलामध्ये टाकून त्याचा जलाभिषेक करण्यात आला. या पूजनासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी पोटे व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सौ अनुराधा नागवडे या उपस्थित होत्या. याप्रसंगी स्मारकाविषयी ऐतिहासिक माहिती प्रा डॉ नारायण गवळी व सचिन झगडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी शिंदे स्मारकाचे रक्षक रत्नाकर हराळ,रमणिकभाई पटेल,सुधाकर जाणराव,अँड रंगनाथ बिबे , सौ सुरेखा लकडे,रमेश गांधी,दत्तात्रय जगताप,गोरख नागवडे,सतीश शिंदे, विनायक ससाणे,दत्तात्रय शिंदे,अनिल बोरुडे,ईश्वर कणसे,संदिप माने,दिलीप धाडगे तसेच शिंदे परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here