इतिहासात डोकावल्यास यक्षप्रश्नांची उत्तरे मिळतात ः डॉ. गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

इतिहासात डोकावल्यास यक्षप्रश्नांची उत्तरे मिळतात ः डॉ. गायकवाड

 इतिहासात डोकावल्यास यक्षप्रश्नांची उत्तरे मिळतात ः डॉ. गायकवाड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पर्यटक, मार्गदर्शक, ऐतिहासिक पत्रकारिता, इतिहास लेखक, ऐतिहासिक लघुचित्रपट, डॉक्युमेंटरी, मंदिर व मूर्ती वाचन अशा विविध क्षेत्रांत इतिहास विषयातून रोजगाराच्या सधी असल्याचे मत डॉ. लहू गायकवाड यांनी व्यक्त केले.
   पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ण्ड सायन्स महाविद्यालयात  या महाविद्यालयात  इतिहास विभागाच्या वतीने इतिहास विषयातील नोकरी व्यावसायाच्या संधी या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.   इतिहास विषयातील नोकरी व्यावसायाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा, शिक्षक, मानववंशशास्र, पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्, पुराभिलेखागार याबरोबरच जुनी कागदपत्रे वाचन, मोडी, ब्रह्मी, प्राकृत, खारोष्टी, पाली या भाषेच्या अभ्यासाने कशा प्रकारे रोजगार निर्माण होईल याविषयी मार्गदर्शन केले.  
   कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, महाविद्यालयातील नवनवीन उपक्रम आणि प्रत्येक विषयाच्या करिअरच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. असे मत व्यक्त केले.
   महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे सर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. भीमराज काकडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. हरीश शेळके, प्रा. नंदकुमार उदार, डॉ. माया लहारे प्रा. विद्या फंड, प्रा  आबासाहेब गंडाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here