ग्रामदैवत गोदड महाराजांच्या रथाची प्रतिकृती कर्जतमध्ये दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

ग्रामदैवत गोदड महाराजांच्या रथाची प्रतिकृती कर्जतमध्ये दाखल

 ग्रामदैवत गोदड महाराजांच्या रथाची प्रतिकृती कर्जतमध्ये दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या रथाची प्रतिकृती बस स्थानक कर्जत या ठिकाणी बसविली जाणार असून सदर तीन मजली रथाची प्रतिकृती आज कर्जत शहरात दाखल झाली, आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या रथाच्या प्रतिकृतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. सदर हुबेहूब बनविलेल्या रथाची प्रतिकृती सकाळी 11 वा अक्काबाई चौकात येताच भाविकांनी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, महिला यांनी या वाहनांचे पूजन करत या रथाचे स्वागत केले येथुन कर्जत बस स्थानका पर्यत भजनी मंडळाच्या समवेत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे, मेघनाथ पाटील, अनिल काकडे, शरद काकडे, सुनील शेलार, सुरेश खिस्ती, दत्तात्रय शिंदे, मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, बापुसाहेब नेटके, भास्कर भैलूमे, सचिन कुलथे, अभय बोरा,  दिलीप जाधव, रज्जाक झारेकरी, बिभीषण खोसे, राजेश्वरी तनपुरे, अशोक जायभाय, दीपक यादव, सतीश पाटील, अशोक डोंगरे, नाथा गोरे, ऋषिकेश धांडे, आदी सह अनेक जण उपस्थित होते. कर्जत बस स्थानकावर आरती होऊन या मिरवणुकीची सांगता झाली.
कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आ रोहित पवार यांनी जाहीर केला असून शहराच्या सौदर्यात भर घालण्यासाठी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांचा रथाची प्रतिकृती बनविण्यात आले आली असून सदर रथ कर्जत येथील बस स्थानकाच्या चौकात उभारण्यात आले येणार आहे असून या रथाचे लोकार्पण दि 19 फेब्रु रोजी दुपारी 4 वा होणार आहे.

No comments:

Post a Comment