वाहिरा येथे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

वाहिरा येथे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे

 वाहिरा येथे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे शिवजयंती निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले यामधे. प्रश्न मंजुषा, रांगोळी स्पर्धा, संगीत खूडची,  निबंध लेखन ,अशे विविध उपक्रम साजरे करण्यात आले होते.दि.16/2/2021 यादिवशी प्रश्न मंजुषा आयोजित केली होती.दि.17/2/2021रोजी रांगोळी स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा,चे आयोजन करण्यात आले होते.
   यावेळी संगम बाबासाहेब पगारे,हीने गड किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावराचे चीत्र रांगोळी तुन रेखाटले  व प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी गावचे उपसरपंच सतीश आटोळे,पो.पाटील शिवाजी झांजे , पोलीस अधिकारी आनंद पगारे, , सतीश चंदिले, बाळु झांजे,शेख महंमद महाराज यांचे वंशज ह-भ-प मोसीम महाराज, व वाहीरा ग्रामस्तांनी तीचे कौतुक केले. व पुढे  दि.18/2/2021 रोजी प्रा.आमोल सांयबर दि.19/2/2021रोजी व्याख्खाते डॉ.मेहेबुब सय्यद यांचे व्याख्यान होणार आहे, असे निवेदन दिले व सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच सतीश आटोळे यांनी केले.

No comments:

Post a Comment