6 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

6 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती.

 6 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्य पोलीस दलातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 6 निरीक्षकांचा समावेश आहे. वर्षभरापासून सहाय्यक निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत होते.
मात्र, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नव्हता. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न रखडला होता, तो आता मार्गी लागला आहे. गृह विभागाने नुकतेच याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील 6 जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती सहाय्यक निरीक्षक दीपक बोरसे, जनार्दन सोनवणे, सतीश गावित, मोहन बोरसे, नीलेश कांबळे आणि शाहिदखान पठाण या 6 जणांचा पदोन्नतीत समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here