नगरमध्ये उद्योजकांना, कामगारांना पोषक वातावरण! आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

नगरमध्ये उद्योजकांना, कामगारांना पोषक वातावरण! आ. संग्राम जगताप

 नगरमध्ये उद्योजकांना, कामगारांना पोषक वातावरण! आ. संग्राम जगताप

आ.संग्राम जगतापांकडुन 90 युवकांना रोजगार...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या संकटामुळे आपल्याबरोबर देशाभर अनेक युवक बेरोजगार झाले. मात्र आयटी पार्कमधील 2500 युवकांना रोजगार मिळत होता. आता राज्यभरातील विविध कंपन्या स्वत:हून संपर्क साधत आहे. आम्हाला आयटी पार्कमध्ये जागा द्या. त्यामुळे नवनवीन कंपन्या नगरमध्ये येत आहेत. अनेक युवकांना रोजगार मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. आयटी पार्क सुरु करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात सर्वांच्या सहकार्यातून उतरविले. शहरामध्ये विविध विकासकामे सुरु असल्यामुळे आपल्या शहराचे विस्तारीकरण चारही बाजुने वाढत आहे. काही लोक स्वतःच्या राजकारण करण्यासाठी नावे ठेवण्याचे काम करतात. आपणही त्यांच्या हा मध्ये हा मिळववतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यभर शहराची बदनामी करतो, असे न करता सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रेम करावे. विकास कामामध्ये सामील व्हावे, शहरामध्ये उद्योजकाला व कामगारांना पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

एमआयडीसीतील आयटी पार्कमधील कंपन्यांच्यावतीने 90 युवकांना नेमणूक पत्र देण्याच्या कार्यक्रमात आ. संग्राम जगताप बोलत होते. आ. जगताप पुढे म्हणाले की शहरातील युवकांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार मिळावा, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आयटी पार्कच्या माध्यमातून युवकांना आशेचे किरण निर्माण करुन दिले आहे. विकासकामामध्ये सर्वात मोठा भाग म्हणजे रोजगार आहे. यासाठी आयटी पार्कच्या माध्यमातून काम करत आहे. गेल्या 270 वर्षापासून दुर्लक्षित पडलेल्या आयटी पार्क सुरु व्हावे, यासाठी 2019 पासून प्रयत्न करत आहे. राज्याबरोबरच देशामधील उद्योजक व कंपन्यांशी चर्चा केली. आयटी पार्कमध्ये कंपन्यांनी आपले कामही सुरु केले.
यावेळी डॉ. दीपक म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी आपल्या कमी वयात इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वांना बरोबर घेऊन नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. एमआयडीसीमध्ये 200 वर्षापूर्वी तयार झालेले आयटी पार्क 20019 ला सुरु करुन युवकांना रोजगार देण्याची जी संकल्पना पुढे आणली, हे काम कौतुकास्पद आहे. स्थानिक सुशिक्षित युवक रोजगार मिळविण्यासाठी इतर शहरामध्ये आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करून कंपनीला भरारी देत आहे. आपल्याच युवकांना आपल्या शहरात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या माध्यमातून खर्‍या अर्थाने युवकांना भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. साईदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून शहरातील विविध डॉक्टर्स, नर्स व अधिकारी कर्मचार्‍यांबरोबर एक हजार नागरिकांना रोजगार दिला.
साईदीप हॉस्पिटल सुरु केले तेव्हा इतर शहरात काम करणारे युवक पुन्हा नगरमध्ये आले. कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये आ. जगताप हे धावून येणारे आमदार आहेत. आमदारांचे काम काय आहे, हे संग्राम जगताप यांनी शहराबरोबरच राज्याला दाखवून दिले आहे. यावेळी फास्टट्रॅक इन्फोटेक, फोर्थ ट्रक इन्फोटेक, पीएम ट्रॅक, आयान क्लोबल सर्व्हिसेस, आयडिस टू इम्पॅक्टस्, विष्णू ट्रेडींग कंपनी, वाई टेक्नोलॉजी प्रा. लि., केएसआयटी सोल्यूशन्स आदी कंपन्यांनी शहरातील 90 युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याचबरोबर आता सुमारे 400 युवक आयटी पार्कमध्ये काम करत आहे.
यावेळी प्रसिद्ध डॉ. एस. एस. दीपक, डॉ. रवींद्र मिरगणे, उद्योजक हरजित सिंह वधवा, किरण भंडारी, राजेंद्र काळे, इंजि. विजयकुमार पादीर, अँड. शिवाजी कराळे, विक्रम वाडेकर, बांधकाम व्यवसायिक अनिल मुरकुटे, उद्योजक राजेंद्र कटारिया, डॉ. रणजीत सत्रे, संजय बंदिष्टी, राजेश आठरे, सुमित लोढा, नगरसेविका शितल जगताप, डॉ. बबन डोंगरे, माधवराव लामखडे, दत्ता पाटील सप्रे ,नगरसेवक अविनाश घुले, विनित पाऊलबुद्धे, समद खान,सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, मुजाहिद कुरेशी, अजिंक्य बोरकर, विपूल शेटीया, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरुडे, धनंजय जाधव, अँड. राजेश कातोरे, सचिन जाधव, दिनेस छाबरिया, हनुमंत कातोरे, महेश कांडेकर, किरण कातोरे, संभाजी पवार, राजेश आठरे, सागर सप्रे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here