शाळा शुल्क 100 टक्के भरावा लागणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

शाळा शुल्क 100 टक्के भरावा लागणार

 शाळा शुल्क 100 टक्के भरावा लागणार

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमधील महिन्यांची 100% शुल्क पालकांना शाळांमध्ये भरावीच लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. राजस्थानातून आलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला, असला तरी तो आता देशभरात लागू होऊ शकतो. परिणामी महाराष्ट्रातील पालकांनाही हा मोठा दणका आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांनी राजस्थानमधील एका शाळा व्यवस्थापन समितीने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना स्पष्ट सांगितले की, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शाळा शुल्क 100 टक्के भरावी लागेल. 5 मार्च 2021 पासूनची थकीत शाळा शुल्क सहा हप्त्यांमध्ये भरता येईल. एकीकडे हे आदेश देतानाच न्यायालयाने असेही बजावले की, पालकांनी शाळा शुल्क भरली नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येणार नाही. किंवा दहावी बारावीच्या परीक्षांपासून शुल्क न भरणार्या मुलांना वंचित ठेवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश म्हणजे मुंबईसह राज्यातील पालकांना मोठा धक्का आहे.

No comments:

Post a Comment