उद्या बिल्डर व आर्किटेक्ट यांचे देशव्यापी धरणे आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

उद्या बिल्डर व आर्किटेक्ट यांचे देशव्यापी धरणे आंदोलन.

 उद्या बिल्डर व आर्किटेक्ट यांचे देशव्यापी धरणे आंदोलन.


नगरी दवंडी/
प्रतीनिधी
अहमदनगर ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्व्हेअर असोसिएशन आणि क्रिडाई संघटनेच्या वतीने सिमेंट व स्टील दरवाढी विरोधात उद्या देशव्यापी धरणे आंदोलन व  एक दिवसाचा संप करण्यात येणार आहे. उदया दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह मागील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थपक अध्यक्ष जवाहर मुथा यांनी दिली.
     मागील काही दिवसापासून स्टिल व सिमेंटच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. सिमेंट जवळपास 25 % तर स्टिल 50 % महाग झाले आहे. नगर’मध्ये काम करणा-या आर्किटेक्स् इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सर्वेअर्स असा, क्रिडाई आणि बिल्डर्स असो.ऑफ इंडिया, अहमदनगर सेंटर वतीने या दरवाढीचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या तिनही संघटना चे  नगरमध्ये 2000 पेक्षा जास्त इंजिनिअर्स, बिल्डर्स बांधकाम व्यवसाय करत असून या सातत्याने होणार्‍या दरवाढीने हा व्यवसाय धोक्यात आलो आहे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी व संस्थेच्या या मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांना दर कमी झाल्यावर बांधकाम करणे शक्य होण्यासाठी सदर धरणे आंदोलन करण्याचा मानस आहे. धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या  बैठकीस अन्वर सरदार शेख, प्रदिप मधुकर तांदळे, अनिल कोठारी, जवाहर मुथा,  मच्छिंद्र पागिरे, मनोज गुंदेचा, विजयकुमार पादिर आदी तिन्ही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here