जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत धावली... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत धावली...

 जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत धावली...

सहमती एक्स्प्रेस !
17 जागा बिनविरोध, 4 जागांसाठी होणार निवडणूक.
आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, वैभव पिचड, विठ्ठलराव लंघे यांची निवडणुकीतून माघार.

अहमदनगर ( नगरी दवंडी/प्र
तीनिधी) ः जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून आज अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे, सुजय विखे पिता-पुत्र व बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांभोवतीच या निवडणुकीची सर्व सूत्रे फिरली आहेत. गत निवडणुकीत विखे काँग्रेसमध्ये होते.आज ते भाजपात आहेत एवढाच काय तो बदल झालेला आहे. आज या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महा विकास आघाडी असा सामना रंगेल अशी अपेक्षा असताना सहमतीच्या राजकारणाची एक्सप्रेस दुपारपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. या सहमतीतुन 17 जागा बिनविरोध झाल्या असून आता 20 फेब्रुवारीला 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
   जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील मात्तब्बर नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली व सहमतीचे निकराचे प्रयत्न केले. अर्ज माघारीच्या  शेवटच्या दिवशी इच्छुकांची एकच धांदल उडाली. समेट घडवून आणण्यासाठी इच्छुकांची मनधरणी करताकरता नेतेमंडळींची दमछाक झाली. कोण कुठे व कधी माघार घेते हे चित्र क्षणाक्षणाला बदलले. पडद्याआड राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाव अनेक उमेदवारांना माघार  घ्यावी लागली आहे.
    जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचा अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सिताराम गायकर, राहुल जगताप, अमोल राळेभात, माधवराव कानवडे, अरुण तनपुरे, विवेक कोल्हे, शंकरराव गडाख, मोनिकाताई राजळे, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे यांची सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली असून महिला मतदार संघातुन अनुराधा नागवडे व आशा काकासाहेब तापकीर शेतीपुरक मतदारसंघातून आ. आशुतोष काळे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अमित अशोक भांगरे, ओबीसी मतदार संघातून करण ससाणे, भटक्या विमुक्त जमातीतुन गणपतराव सांगळे हे बिनविरोध निवडून आले.  नगर तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले व सत्यभामा बेरड यांच्यात लढत होणार आहे. कर्डिले यांनी मोठे प्रयत्न करूनही ते बिनविरोध निवडून येऊ शकले नाहीत.
    पारनेर सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले व उदय शेळके यांच्यात तर कर्जत सोसायटी मतदार संघातून अंबादास पिसाळ व अन्य दोघे अशी तिरंगी लढत होणार आहे.पतसंस्था मतदारसंघातून दत्तात्रय पानसरे व प्रशांत गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.

No comments:

Post a Comment