राघोहिवरेच्या सरपंचपदी भाऊसाहेब दहिफळे, उपसरपंच सौ. मंगल कराळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

राघोहिवरेच्या सरपंचपदी भाऊसाहेब दहिफळे, उपसरपंच सौ. मंगल कराळे

 राघोहिवरेच्या सरपंचपदी भाऊसाहेब दहिफळे, उपसरपंच सौ. मंगल कराळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

मिरी  ः  पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अखेर भाऊसाहेब दहिफळे तर उपसरपंच पदी सौ.मंगल कराळे यांचीच अपेक्षेप्रमाणे निवड करण्यात आली आहे.
     माजी सरपंच राहिलेले भाऊसाहेब दहिफळे हेच सरपंच पदाचे एकमेव दावेदार मानले जात होते.या निवडीपुर्वीच दहिफळे यांच्या शनैश्वर ग्रामविकास मंडळाच्या सर्व विजयी सदस्यांनी भाऊसाहेब दहिफळे हेच सरपंच राहतील असे जाहीर याआधीच जाहीर केले होते.
    एकुण सात सदस्य असलेल्या राघोहिवरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांनी मानसिकता नसताना देखील सहकार्‍यांच्या आग्रहाखातर शनैश्वर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून उमेदवार उभे केले.व मागील काळात केलेल्या विकासकामांमुळे व ग्रामस्थांशी असलेल्या ऋणानुबंधामुळे सातपैकी चार जागा जिंकून बहुमत मिळवले होते.विरोधकांना देखील सत्ता आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी अवघ्या एका सदस्याची गरज असताना त्यांच्याकडून मात्र त्यादृष्टीने प्रयत्न झाले नसल्याचे दिसून आले.
    त्यामुळे सरपंच निवडीवेळी देखील विरोधी पॅनेलचे सदस्य गैरहजर राहिल्याने भाऊसाहेब दहिफळे यांची सरपंच पदी तर सौ. मंगल कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीचे अनेकांनी स्वागत केले असून राघोहिवरे येथील सुखदेव जाधव,भरत गिर्हे,बाळासाहेब कुर्हे,दिलीप कुर्हे,जब्बर कुर्हे,विक्रम होंडे,आण्णासाहेब होंडे,सुखदेव कुर्हे,अशोक नरवडे,नारायण कुर्हे,संभाजी कोंडीबा वांढेकर,मोहन नरवडे, अण्णाभाऊ गिर्हे, पोपट गिर्हे, बाबा गिर्हे,सुखदेव गिर्हे, रवींद्र कराळे,अमोल कराळे,नितीन दहिफळे, बाबासाहेब दहिफळे,संभाजी कराळे,चंद्रशेखर कराळे,सतीश कुर्हे,सतीश होंडे,चिमाजी वांढेकर,शांताराम गायकवाड,संजय कुर्हे,देवीदास मराठे,गणेश गिर्हे,शरद कुर्हे,अंकुश कुर्हे,गवळी कुर्हे,हरिभाऊ जरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here