अभय क्लॉथच्यावतीने मोतीबिंदू शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

अभय क्लॉथच्यावतीने मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

 अभय क्लॉथच्यावतीने मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः मोतीबिंदू हा सर्वसामान्य आजार होऊ लागला असून त्यावर उपचार होणे अत्यंत गरजेचे असल्याने कर्जत येथे हळदी कुंकू कार्यक्रमात अभय सुमतीलाल बोरा यांच्या अभय क्लॉथच्या वतीने मोतीबिंदू आरोग्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि 14 फेब्रु रोजी सकाळी 10 ते दु 1 या दरम्यान अभय सांस्कृतिक भवन (भाग्यतारा मंगल कार्यालय) प्रभातनगर कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे.
   या शिबिराचा लाभ स्त्री पुरुषानी घ्यावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलानी उपस्थित रहावे असे आवाहन सौ. गीता अभय बोरा कु सुनंदा बोरा, कु अनिता बोरा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment