सर्वसामान्यांना जमीन व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी तहसील कार्यालयात प्रतिमा फलक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

सर्वसामान्यांना जमीन व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी तहसील कार्यालयात प्रतिमा फलक

 सर्वसामान्यांना जमीन व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी तहसील कार्यालयात प्रतिमा फलक


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः सर्वसामान्यांना आपल्या जमीन व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी सहज , सुलभ व सचित्र गोष्टीरुपी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात महाराजस्व अभियानांतर्गत माहिती प्रतिमाफलक नागरिकांसाठी आकर्षण व लक्षवेधी बनले आहे.

 सर्वसामान्य नागरिकांना कायदे व नियम माहीतच असतील असे नाही , कायद्याचे ज्ञान नसलेने सर्वसामान्य शेतकर्‍यांची व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. व चुकीचा व्यवहार झाला की मग कोर्ट कचेरीच्या फेर्‍या सुरू होतात.या सर्व गोष्टीपासून होणारा त्रास वाचावा व शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये , त्यांना कायद्याची जाण व्हावी या हेतूने सदरची फलक लावले असून सर्वसामान्य शेतकर्‍यांना निश्चितच याचा लाभ होईल
- तहसीलदार एफ. आर. शेख, राहुरी.


महाराष्ट्र शासनामार्फत महसूल विभागाने राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात शेती -जमिनीच्या व्यवहारांच्या वेगवेगळ्या विषयांवर सचित्र मार्गदर्शनपर व गोष्टीरुप प्रतिमाफलक लावल्या आहेत . त्यात महसूल व शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शेतजमिनीच्या विविध व्यवहार व बारीक-सारीक कायदेशीर बाबी चित्र व गोष्टींच्या रूपाने फलकाच्या रूपात लावल्या आहेत. सर्वसामान्यांना हे सहज व सुलभ रीतीने माहिती होईल आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण होईल यादृष्टीने सचित्र व ठळक अक्षरात लावलेल्या आहेत . त्यामुळे ते सध्या सर्वांचे आकर्षण बनले आहे .
    मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या सर्व प्रतिमा झाकून ठेवण्यात आल्या होत्या . त्यामुळे सामान्य नागरिकांना काय झाकवून ठेवले ? हे लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते . मात्र ग्रामपंचायत निवडणुका होताच ही प्रतिमा फलक सर्वांनाच मार्गदर्शक बनवत आहेत . तहसील कार्यालयाच्या आवारात जवळपास 15 -20 प्रतिमा असून या दुय्यम निबंधक कार्यालय , पुरवठा विभाग, जमीन महसूल विभाग, कुळ कायदा आदी महसूल विभागात कार्यरत आहेत .
   जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले तसेच श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी या संकल्पनेचे राहुरी मध्ये आल्यानंतर कौतुक केलेले आहे . राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या व त्यांच्या सहकार्‍यांचे अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here