रासपच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी शरद बाचकर यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

रासपच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी शरद बाचकर यांची नियुक्ती

 रासपच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी शरद बाचकर यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी

माका ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणुन रासपचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष शरद बाचकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
   याबाबत असे की, पक्ष संस्थापक महादेवजी जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली,पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष आमदार गुटटे तसेच महासचिव दोडतले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील पदाधिकारयांच्या निवडी करण्यात आल्या.बाचकर यांच्या जागी उत्तर नगर जिल्हाअध्यक्ष पदी पक्षाचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ जुंधारे तर दक्षिण नगर जिल्हाअध्यक्ष पदी नगर जिल्हा सचिव गंगाधर कोळेकर यांची जिल्हाअध्यक्ष प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.बाचकर तसेच जुंधारे,कोळेकर यांचे जिल्ह्यातील रासप पक्षाचे संघटन तसेच बळकटीकरणासाठी मोठे योगदान असल्याकारणाने पक्षाने त्यांचेवरती मोठी जबाबदारी टाकली असल्याचे दिसून येते आहे.
   याबाबत त्यांच्या निवडीचे स्वागत तसेच अभिनंदन पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष संभाजी लोंढें,रासपचे नेवासा तालुक्याचे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे,उपाध्यक्ष शिवाजी सुपनर,नेवासा युवक आघाडीचे अध्यक्ष सचिन देवकाते,उपाध्यक्ष विशाल माकोणे,तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here