मालेवाडीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

मालेवाडीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड

 मालेवाडीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः पाथर्डी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या मालेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आजिनाथ दराडे तर उपसरपंचपदी सुनील खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी एका मतांनी सुनील खेडकर यांच्या पॅनलने विजयश्री खेचून आणला निवडणुक अधिकारी म्हणुन  बाळासाहेब  येवळे यांनी काम पाहिले .निवडणुकीत किरण खेडकर प्रणित भगवानबाबा ग्रामविकास पॅनलने सहा ठिकाणी विजय मिळवत बहुमत प्राप्त केले होते.
   सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत होत असून अनेकांनी सरपंच व उपसरपंचांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याच्या भावना यावेळी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचानी व्यक्त केल्या.तसेच निवडणुकीतील वादविवाद हेवेदावे विसरून गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू असे आश्वासन पॅनलप्रमुख किरण खेडकर यांनी दिले.

No comments:

Post a Comment