कर्जतच्या स्नेहप्रेमचे फारूक बेग कै. राहणे स्मृती पुरस्काराने सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

कर्जतच्या स्नेहप्रेमचे फारूक बेग कै. राहणे स्मृती पुरस्काराने सन्मानित

 कर्जतच्या स्नेहप्रेमचे फारूक बेग कै. राहणे स्मृती पुरस्काराने सन्मानित

नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः कर्जत येथील स्नेहप्रेम संस्थेचे फारुक बेग यांना बहादरपूर, कोपरगांव येथील सामाजिक कार्यकर्ते कै.भाऊसाहेब राहणे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकरा हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, स्नेहालयचे डॉ.गीरीश कुलकर्णी यांचे हस्ते हा पुरस्कार फारूक बेग यांना प्रदान करण्यात आला  या वेळी स्नेहप्रेमच्या कार्याचा डॉ.गीरीश कुलकर्णी यांनी गौरव करत आढावा देखील घेतला व तरुणांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देताना फळाची अपेक्षा न करता कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले तर बीजमाता राहीबाईं पोपरे यांनी देशी बी-बीयानाची माहिती दिली ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी बीजबँंक असावी  आणि यासाठी कर्जत शहरात स्नेहप्रेमने पुढाकार घ्यावा असे म्हटले या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह, जयवंतराव गडाख, भरत कुलकर्णी, स्नेहसावलीचे अमर हजारे, स्वाती ढवळे, प्रा. गाढे सर, प्रा. शिला दरेकर मॅडम संदिप रोहमारे, बाळासाहेब भोसले उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे यशस्वीते साठी आशा हासे, प्रकाश राहणे यांचे सह बहादरपुर ग्रामस्थानी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here