बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानचा उपक्रम

 बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानचा उपक्रम

शनिवारी सावेडीत गायनाची बहारदार मैफल
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 2020 हे वर्ष कोरोनाशी लढा देत गेले, काहींचा लढा यशस्वी ठरला तर काही कोरोना पुढे हरले धार्मिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने होती, त्यामुळे वर्षभर बंदिशचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शासकीय नियमांचे पालन करुन शनिवार दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी सावेडीमधील रावसाहेब पटवर्धन स्मारकात सायं 6 वा. शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची बहारदार मैफल होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष लक्ष्मणराव डहाळे यांनी दिली.
   बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान आयोजित निलेश-स्वरगन्ध शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या बहारदार मैफलमध्ये पुणे येथील पं.विजय बक्षी यांचे शिष्य निलेश खळीकर (न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज संगीत विभाग प्रमुख) हे कलाकार उपस्थित राहणार असून, तबला वादक कल्पेश अदवंत व हार्मोनियमवर प्रा.मकरंद खरवंडीकर साथ देतील. ही मैफल सर्व नगरकरांसाठी खुली आहे, मात्र मास्क घालणे बंधनकारक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here