हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास येणारा खर्च टाळून - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास येणारा खर्च टाळून

 हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास येणारा खर्च टाळून

स्नेहप्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः हळदी कुंकवाचा कार्यक्रम टाळून शहाजीनगर येथील सहयोग महिला फाऊंडेशनच्या महिलांनी हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमास येणारा खर्च टाळून स्नेहप्रेम या संस्थेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू, कपडे व खाऊ वाटप करुन आगळावेगळा उपक्रम आयोजित केला.
    कर्जतमधील शहाजी नगर येथील सहयोग महिला फाउंडेशन च्या महिलांचा ग्रुप नेहमीच सामाजीक कार्यात सक्रिय असतो कर्जत शहरात तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या श्रमदान चळवळीत ही सहभाग घेऊन श्रमदान करणार्‍या या महिलांनी शहाजीनगर  भागात स्वच्छता करत स्वच्छ कर्जत अभियानात ही मोठा सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सौ.वंदना पोटरे, सौ.वैशाली शिंदे, सौ.सीमा खाटेर, सौ. मनिषा जाधव,सौ.तारा गुप्ता, सौ. होले मॅडम, सौ.शिल्पा माळवे. सौ. उषा कांबळे यांचा सहयोग असतो.
     यावर्षी कोरोनाच्या काळात विविध कार्यक्रमांना फाटा दिला जात असताना व कर्जत शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून चढाओढ पहावयास मिळत असताना सहयोग महिला फाऊंडेशनच्या महिलांनी हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमास येणारा खर्च टाळून स्नेहप्रेम या संस्थेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू, कपडे व खाऊ वाटप करुन आपले खाते वेगळेपण जपले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमा चे प्रास्ताविक सौ.होले मॅडम यांनी केले. सौ वंदना पोटरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व महिलांच्या भावना व्यक्त केल्या केले. यावेळी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी मनोगत व्यक्त केले
      स्नेहप्रेमचे संचालक फारूक बेग यांनी या उपक्रमाबद्दल सर्व महिलांचे आभार मानले. स्वाती ढवळे यांचे सह अनेक जण उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व महिलांमध्ये कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment