खोदकाम करताना सापडले शिवकालीन तोफेचे गोळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

खोदकाम करताना सापडले शिवकालीन तोफेचे गोळे

 खोदकाम करताना सापडले शिवकालीन तोफेचे गोळे


जामखेड -
खर्डा येथिल किल्ले शिवपट्टन या ठिकाणी कील्याच्या दुरुस्ती साठी खोदकाम करत आसताना 250 तोफ गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे. सापडलेले तोफगोळे खर्डा किल्ल्यात जपून ठेवुन येणार्या पर्यटाकासाठी किल्याच्या आवरातच वास्तु संग्रहालय करुन ठेवण्यात याव्यात अशी मागणी शिवप्रेमींन कडुन होत आहे.

   हे तोफगोळे हे पंधरा ते वीस दिवसांपुर्वीच कील्याच्या दुरुस्ती चे काम सुरू आसताना खोदकाम चालु होते याच वेळी या ठिकाणी हे तोफगोळे सापडले आहेत. तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा खर्डा येथील इतिहास संशोधक प्रा. जावळेकर यांनी केला आहे. खर्डा कील्यावर तोफगोळे आढळून आल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली आहे. त्यामुळे तोफगोळे पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. किल्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे लवकरात लवकर व्हावे तसेच जे काही पुरातन वस्तु मिळतील त्या जपून ठेवुन पर्यटाकासाठी किल्याच्या आवरातच पुन्हा मांडाव्यात याव्यात अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यानी केली आहे. तसेच पावनेचार कोटीचा निधी योग्य ठिकाणी योग्य जागी वापरण्यात यावा व किल्याचे वैभवात भर पडेल असे काम पुरात्व विभाग तसेच ठेकेदारने जातीने लक्ष घालुन करावे अन्याथा चुकीच्या कामाला श्री शिवप्रतिष्ठान चा कायम विरोध राहिल असे देखिल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यानी सांगितले.
    खर्डा येथील 1795 च्या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभुत करुन विजय प्रात केला होता. आजही खर्डा भागात अनेक ठीकाणी युध्दाच्या खुणा सापडत आहेत. रणटेकडी दौडवाडी येथुन युध्दाची तयारी आखली जात होती तेथे ही टेकडी रणांगणाची साक्ष देत उभी आहे. अनेक शेतकरी बांधवांना देखील नागंरताना तोफ गोळे, ढाल, तलवारी मिळुन आलेल्या आहेत. ही लढाई पाणीपत नतंर विजयाची शौर्याची गाथा ठरली आहे. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तु इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here