लघुशंका करू नको म्हटल्याचा राग.. वायरमनला मारहाण; गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

लघुशंका करू नको म्हटल्याचा राग.. वायरमनला मारहाण; गुन्हा दाखल.

 वायरमनला मारहाण; गुन्हा दाखल.

लघुशंका करू नको म्हटल्याचा राग..
महावितरण तेलिखूंट पावर हाऊस येथील कर्मचार्‍याला काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने मारहाण केल्याच्या निषेधार्त महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक तांत्रिक कामगार संघटना, एस.ई.ए. आणी महाराष्ट्र स्ट्रेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण अहमदनगर कार्यालयासमोर  निषेध सभेचे आयोजन करण्यात आले!!!  याप्रसंगी दत्तात्रेय वामन: भाऊसाहेब भाकरे  मी.र.वि.तां.का.संचटना. राज्य सचिव राजेंद्र धाडगे. सब ऑर्डिनेट इंजिनिअर असोशियेशन मंडळ सचिव भरत पवार साहेब, रमेश पालवे साहेब, व इतर बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः तेली खुंट पॉवर हाऊसच्या कार्यालयात लघुशंका करीत असलेल्या निखिल बाळकृष्ण धंगेकर यास येथे “लघुशंका करू नको” असे सांगणारे वायरमन अमोल भानुदास शेळके यांचा राग मनात धरून चामडी पट्ट्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा निखिल धंगेकर यांचेवर दाखल करण्यात आला आहे.
   सदर घटनेची हकीकत अशी की, काल रात्री 10:30 च्या दरम्यान तेलिखुंट पॉवर हाऊसच्या महावितरण कार्यालयात येवून तेथेच राहणार्‍या निखिल धंगेकर यांनी लघुशंका करण्यास सुरुवात केली. यावेळी महावितरणच्या या कार्यालयात नोकरी करणारे वायरमन अमोल शेळके यांनी तू या कार्यालयात लघुशंका करीत आहे असे विचारले असता निखिल यास याचा राग आला व त्यांनी वायरमन यांना शिवीगाळ करून चामडी बेल्टने मारण्यास सुरुवात करून शासकीय कामात अडथळा आणला. निखिल धंगेकर यांचे विरोधात 353, 332, 504, 506 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोसई सुरज मेढे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment