इब्टा प्रणित बहुजन मंडळ स्वबळावरच निवडणूक लढविणार- एकनाथ व्यवहारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

इब्टा प्रणित बहुजन मंडळ स्वबळावरच निवडणूक लढविणार- एकनाथ व्यवहारे

 इब्टा प्रणित बहुजन मंडळ स्वबळावरच निवडणूक लढविणार- एकनाथ व्यवहारे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः इब्टा प्रणित बहुजन मंडळ स्वबळावर प्राथमिक बॅकेची निवडणुक  लढविणार असल्याचे इब्टा प्रणित बहुजन मंडाळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी सांगीतले. आयडियल बहुजन टीचर्स असोशिएशन अहमदनगर व बहुजन मंडळ अहमदनगर वतीने जिल्हास्तरावरील पदाधिकारी सहविचार सभा अहमदनगर येथे संपन्न झाली.या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या सभेचे आयोजन करण्यात आले .यावेळी बहुजन मंडळाच्या पुढील उपक्रमाबाबत जिल्ह्याचा आढावा घेण्यात येऊन पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.करोना काळात लोकांना एकत्र करण्याची अडचण असतानाही केवळ इब्टा संघटनेने बेहिशेबी घड्याळ खर्च घोटाळा, जिल्हास्तरशिक्षक वेबिनार उपक्रम आयोजन, जिल्हास्तर वक्तृत्व,काव्यगायन,निबंध स्पर्धा गुण गौरव पुरस्कार आयोजन, महिलादिनानिमित्त शिक्षिका पुरस्कार,पदमश्री राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव सन्मान असे अनेक अभिनव उपक्रम साकारून जिल्ह्यात आयडियल असणारी एकमेव अग्रेसर असणारी इब्टा संघटना म्हणून भक्कम पर्याय उभा आहे अशी भावना राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे यांनी व्यक्त केले.इब्टा स्वबळावर लढून सभासदांच्या हितासाठी तसेच जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक बँकेतही उल्लेखनीय काम करणार आहे असे नवनाथ अडसूळ  यांनी सांगीतले या  प्रसंगी  जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ ,एकनाथ व्यवहारे, सुहास पवार,अशोक नेवसे , अविनाश बोधक आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे, नवनाथ अडसूळ, जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, बहुजन जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे सर, भागवत लेंडे,  सुहास पवार,रामभाऊ गवळी,  अशोक नेवसे ,  रवींद्र रुपवते, संतोषकुमार शिंदे, संगमनेर  अविनाश बोधक,  सतिष मुंतोडे, सुनील गायकवाड, जालिंदर राऊत, रवींद्र होले,संजयकुमार लाड,कर्जत  शाम राठोड, विजय चिकने, परमेश्वर रणधरे, उत्तम जगधने,भानुदास तांदळे,संतोष सोनवणे,ज्ञानेश्वर घेगडमल, नंदकुमार पवार, शिवाजी गायकवाड,सुरसे, चंद्रकांतदिवटे, अशोक राऊत,दिलीप खराडे, परिमल बनसोडे,दौलत गोडे, कैलास वाघमारे,मनोहर यादव, चंद्रभान मेंगाळ, महेंद्र सुरसे, रावसाहेब सरोदे,धर्मराज घुले,राजू घोडके, सुहास ठिपसे,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment