आघाडी सरकार स्थापन करण्यात थोरातांचेही योगदान ः भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

आघाडी सरकार स्थापन करण्यात थोरातांचेही योगदान ः भुजबळ

 आघाडी सरकार स्थापन करण्यात थोरातांचेही योगदान ः भुजबळ

शालेय साहित्य वाटप करुन ना. थोरातांचे अभिष्टचिंतन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात आज आघाडी सरकार आहे. हे सरकार स्थापन करण्यात बाळासाहेब थोरात यांचेही योगदान नाकारता येणार नाही, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे सुपूत्र ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा सोहळा शहर काँग्रेसच्या तांगेगल्ली संपर्क कार्यालयात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेेवक रुपसिंग कदम होते. राज्यातील राजकारणात बाळासाहेब थोरात आजही नेते आहेत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विरोधी काँग्रेस पक्षाला सत्तेत स्थान प्राप्त झाले. पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी गती देण्याचे काम नवे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले निश्चित करतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी हाच धागा पकडून ना.थोरात यांच्या नेतृत्वाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली, पण स्वबळावर सत्ता प्राप्त करुन देण्याचे काम नवे नेतृत्व नाना पटोले करतील असा विश्वास सर्वांना असल्याने विधानसभा अध्यक्षाचे सर्वोच्च पद आ.पटोले यांनी स्वत:हून सोडले तसे ना.थोरात यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशी ही घटना आहे, असे नमूद केले.पक्षात चढ-उतार असतात.पण,जो निष्ठेने काम करतांना संकुचितपणा न ठेवता असे उपक्रम राबवतात असे बाळासाहेब भुजबळ आणि पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत असेही त्यांनी आवर्जून सागिंतले.
अध्यक्षीय भाषणात रुपसिंग कदम यांनी ना.थोरात यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना राज्यातील या नेत्यांची जिल्ह्यातील सामान्यांशी असलेली नाळ कायम रहावी व तसेच होईल, असे सांगून नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्ह्यातील पक्ष जोमाने वाढवावा लागेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
मी आहे पक्षाचा माझाच आहे पक्ष... एवढेच बाळासाहेबांनी ठेवले होते लक्ष.. पक्ष कार्यासाठी त्यांनी घेतली खांद्यावर धूरा... त्याप्रमाणेच पुढे जाण्याची त्यांनी पाळली परंपरा... वादळे येतात वादळे जातात खंबीर त्यांचे हात... सोडत नाही ते कधी पक्षाची साथ.... काँग्रेस पक्ष वाढावा अशी आहे त्यांची इच्छा....त्या बाळासाहेब थोरातांना वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा !अशी कवी विवेक येवले यांनी काव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या तर ना.थोरात व आ.पटोले यांचे अभिष्टचिंतनाचा ठराव समारंभात पास करण्यात आला.ाप्रसंगी बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गायकवाड, ओबीसीचे अनिल निकम, शहर कॉग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत पवार, माजी पोलिस निरिक्षक व पक्षाचे ज्येष्ठ सदस्य एम.आय.शेख आदिंची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी स्वागत व प्रास्तविक पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. यावेळी ना.थोराता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाउपाध्यक्षपदी अनिल  इवळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा प्रसिध्दीप्रमुख श्री.सटाणकर यांचा सत्कार करण्यात आला. शहर काँग्रेसचे पदाधिकारी अनिल वराडे, संजय झोडगे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, भिंगार काँंग्रेसचे अध्यक्ष आर.आर. पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, पक्षाचे शहर चिटणीस अभिजित कांबळे, श्रीमती उज्वला पारधे, शबाना शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment