साईकृपा कारखान्यास गळीत हंगाम परवानगी देऊ नका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

साईकृपा कारखान्यास गळीत हंगाम परवानगी देऊ नका

 साईकृपा कारखान्यास गळीत हंगाम परवानगी देऊ नका

नाहाटा व भोस यांची साखर आयुक्तांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे अदा केल्याशिवाय माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव येथील खाजगी साईकृपा कारखान्याला गाळप परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी बाळासाहेब नाहाटा व टिळक भोस यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. साईकृपा कारखान्यावर साखर आयुक्त यांनी आरआरसी ची कारवाई केली आहे. तसेच या पूर्वी या कारखान्याची प्रतिकात्मक जप्ती सुद्धा केलेली आहे. साईकृपा हिरडगाव कडुन श्रीगोंदा ,कर्जत, आष्टी, शिरूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची थकबाकी आहे. यापूर्वी मुंडन आंदोलन, जागरण गोंधळ आंदोलन, उपोषणे अशी अनेक आंदोलने शेतकर्‍यांनी केली आहेत. शेतकर्‍यांबरोबरच अनेक बँकांची थकबाकी असून बँकानी देखील कारवाई केली आहे. त्यात यंदा मोठ्या अडचणीतून विक्रम पाचपुते यांनी हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असे या पूर्वी जाहीर केले आहे. तशी पूर्व तयारी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व संभाजी ब्रिगेड नगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे भेट घेवून. साईकृपा हिरडगाव च्या विरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला आहे. त्यावर साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना फोन करून कारखान्याची तातडीने लिलावाची प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना दिल्या असल्याचे नाहाटा/भोस यांनी सांगितले.मागीलसर्व थकबाकी न दिल्यास या वर्षी गळीत हंगामास परवानगी देऊ नका अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. साईकृपा हिरडगाव कारखण्याकडून ऋठझ ची रक्कम येणे असल्याने त्यांना गाळप परवाना देऊ नका अशी रास्त मागणी साखर आयुक्त गायकवाड यांच्याकडे केली आहे. तरीही साईकृपा चालू झाल्यास साखर आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करू, मात्र शेतकर्‍याचे पेमेंट मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका नाहाटा-भोस यांनी व्यक्त केली. त्यामुळे साईकृपा हिरडगाव चा गळीत हंगाम सुरू करणेसाठी शर्थीने प्रयत्न करणारे विक्रम पाचपुते व राजकुमार ढमढेरे यांच्यासमोर साईकृपा हिरडगावचा गळीत हंगाम सुरू करणेचे आव्हान उभे झाले आहे.

No comments:

Post a Comment