कोरोना काळातील औषधांच्या जीएसटी भरलेल्या बिलांची तपासणी करण्याची मनसेची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

कोरोना काळातील औषधांच्या जीएसटी भरलेल्या बिलांची तपासणी करण्याची मनसेची मागणी

 कोरोना काळातील औषधांच्या जीएसटी भरलेल्या बिलांची तपासणी करण्याची मनसेची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात व जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणार्‍या खाजगी हॉस्पिटल मधील कोरोणावर उपचार झालेल्या रुग्णांच्या औषधांची व त्याच काळातील संबधित सर्व खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकल ने खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांची तपासणी करावी. तसेच कोरोना काळातील उपचार दिलेल्या सर्व खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकल ने औषधे खरेदी केलेल्या जी एस टी बिलांची तपासणी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना अवाच्या सव्वा बिले आलेली आहेत. त्या बिलांचे जिल्हाधिकारी समितीने ऑडिट करून आत्ता पर्यंत 1 कोटी 13 लाख वसूल पात्र रक्कम रूग्णांना परत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आज पर्यंत रुग्णांच्या खात्यावर हीवसुल पात्र रक्कम जमा झालेली नाही. हि वसूल पात्र रक्कम फक्तत हॉस्पिटलची होती. त्यातच त्याच हॉस्पिटल मधुन रुग्णांना औषधे खरेदी करावी लागत होती. त्या औषधांची मेडिकलची बिले सुध्दा हजारो, लाखो रुपयांच्या घरात आली होती. कोरोणा रुग्णांवर उपचार सुरू असताना कोणत्याही नातेवाईकाला रुग्णाला भेटू देत नव्हते. त्या मुळे रुग्णांच्या उपचारासाठी हि औषधे खरंच वापरली गेली का? हा सवाल अनेक रुग्णांचा, रुग्णांच्या नातेवाइकांचा असुन पाच, दहा, पंधरा दिवसात रूग्णांना हजारो, लाखो रुपयांचे औषधे कशी दिली कोणती दिली कधी दिली हे रुग्णांना व नातेवाईकांना माहीत नसून औषधांची हजारो, लाखोंची बिले रुग्णांवर लाधली गेली त्यामुळे या बिलांमध्ये सुध्दा मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हॉस्पिटल व मेडिकल ने खरंच उपचारा दरम्यान हि औषधे रुग्णांवर वापरली आहेत का नाही हे समजुन येईल व औषधे वापरली नसल्यास तसे आपल्या निदर्शनास आल्यास संबधित हॉस्पिटल बरोबर संबधित उपचार देणार्‍या डॉक्टर वर व मेडिकल वर सुध्दा कारवाई करावी व मेडिकल न वापरलेल्या बिलांची सुध्दा रक्कम ही रुग्णांच्या खात्यावर जमा करावी या मागणीचे निवेदन नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या वेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment