अँण्टीकरप्शनच्या जाळ्यात नगरचा पोलीस कॉन्स्टेंबल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

अँण्टीकरप्शनच्या जाळ्यात नगरचा पोलीस कॉन्स्टेंबल!

 अँण्टीकरप्शनच्या जाळ्यात नगरचा पोलीस कॉन्स्टेंबल!

पाच हजाराची लाच मागितली..


पारनेर : पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला पाच हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी नगरच्या लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी अटक केली. शंकर रोकडे असे या हवालदाराचे नाव असल्याचे समजते.

लाचलुचपतने पाच हजार रुपयांच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर त्या दिवशी रक्कम स्वीकारताना त्याला संशय आल्यामुळे तो तेथुन पळून गेला होता. व त्यानंतर आपला फोन बंद करून ठेवला होता. त्यानंतर लाच मागीतल्याची पुर्ण खात्री पडताळल्यानंतर उपअधिक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित पोलीस हवालदाराला नगर येथुन ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या संदर्भातील माहिती अशी की,पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील रहिवाशी असलेले दत्ता जाधव यांना पारनेर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराचा आज आठ दिवसांपुर्वी फोन आला की, तुझ्या बायकोने तुझ्या विरूद्ध केस केली आहे , त्यामुळे मला कारवाई करावी लागेल, आजच पाच हजार रूपये घेवून दोन वाजेपर्यंत पारनेरला या. असा फोन आल्यावर तक्रारदार जाधव यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लोकजागृती सामाजिक संस्थेला या विषयीची माहिती दिली. संस्थेकडून त्यांना लाचलुचपतकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आल्यानंतर त्यांनी ही तक्रार दाखल केली होती.

No comments:

Post a Comment