मराठा आरक्षण प्रकरणी 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

मराठा आरक्षण प्रकरणी 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी

 मराठा आरक्षण प्रकरणी  8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी


मुंबई ः
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू होती. त्यामुळे आज होणार्‍या सुनावणीमध्ये नेमके काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चपासून सुरूवात होणार आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी पार पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्यासाठी 8, 9 आणि 10 तारखेला वेळ देण्यात आला आहे. 12, 15, 16 आणि 17 मार्च रोजी राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलेला असून त्यांची बाजू ऐकली जाईल. 18 मार्च रोजी काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार असून 8, 9 आणि 10 मार्च रोजी मराठा आरक्षणाबाबत याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. तर 12, 15 आणि 16 मार्चसह 17 मार्चरोजी या प्रकरणातील राज्यसरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर महाधिवक्त्यांची बाजू देखील ऐकून घेतली जाणार आहे. यानंतर 18 मार्चरोजीच केंद्र सरकारची बाजू ऐकली जाणार आहे, याचाच अर्थ 8 मार्च रोजी मराठा आरक्षणासंदर्भाच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि 18 तारखेपर्यंत ही सुनावणी सुरु असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात 10 दिवसांत संपूर्ण प्रकरणावरील सुनावणी पार पडेल. दरम्यान, मराठा आरक्षणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायलयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली आहे. यावेळी मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी 8 मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. तर सर्व याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ही समोरासमोर व्हावी अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची सुनावणी झाली.

No comments:

Post a Comment