‘श्रीमान’मधील वस्त्रसंपदा खरेदीचा पुरेपूर आनंद देईल : भास्करगिरी महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

‘श्रीमान’मधील वस्त्रसंपदा खरेदीचा पुरेपूर आनंद देईल : भास्करगिरी महाराज

 ‘श्रीमान’मधील वस्त्रसंपदा खरेदीचा पुरेपूर आनंद देईल : भास्करगिरी महाराज

कापडबाजारातील ‘श्रीमान कलेक्शन’ या वस्त्रदालनाचा शानदार शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्रीमान कलेक्शन या वस्त्रदालनाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल. ग्राहकांमध्ये देव पाहून सेवा केली तर चांगले यश निश्चित मिळते. वैकुंठवासी सद्गुरु गेंडानाथ महाराज यांचा कृपाशिर्वाद लाभलेला भणभणे परिवार या व्यवसायातून मोठी भरारी घेईल. ग्राहकांनाही या दालनात चांगल्या दर्जाची सेवा आणि उत्कृष्ट वस्त्रसंपदा मिळेल, असा विश्वास गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केला.
नगरच्या कापड बाजार माणिक चौक परिसरात पुरुषांसाठी परिपूर्ण व सर्वांगसुंदर खरेदीसाठीचे श्रीमान कलेक्शन या नूतन वस्त्रदालनाचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.
यावेळी पूज्य श्री संगमनाथ महाराज (विशाल गणपती देवस्थान), आ.अरूण जगताप, आ.संग्राम जगताप, आ.आशुतोष काळे, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब जाधव, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, शिक्षक संघटनेचे बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन राजू रहाणे, व्हा.चेअरमन उषा बनकर, विकी जगताप, संजय जाधव, हेमंत जाधव, दत्ता जाधव, नरेंद्र सत्रे, आनंद सत्रे, मीनाताई सत्रे, ‘श्रीमान’चे संचालक महेश भणभणे, सुनिल भणभणे, हर्षल भणभणे, मिराबाई भणभणे आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, संपूर्ण राज्यात नगरची कपड्याची बाजारपेठ प्रसिध्द आहे. या कापडविश्वाच्या वैभवात भर घालणारे वस्त्रदालन भणभणे परिवाराने श्रीमान कलेक्शनच्या रुपाने सुरु केले आहे. याठिकाणी अत्याधुनिक फॅशन, स्टाईलचा सुंदर मिलाफ असल्याने प्रत्येकाला येथे खरेदीचा पुरेपुर आनंद मिळेल. ग्राहकांची आवडनिवड, कल लक्षात घेवून व्यवसायात कायम नाविन्यता ठेवल्यास प्रगती साधता येते. या प्रशस्त दालनात पुरुषांची परिपूर्ण खरेदी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अरूण जगताप व पूज्य संगमनाथ महाराज यांनीही श्रीमान कलेक्शन दालनास शुभेच्छा दिल्या.
सुनिल भणभणे यांनी सांगितले की, सुमारे 3 हजार स्क्वेअर फूटाच्या प्रशस्त दालनात ग्राहकांना अतिशय चोखंदळपणे खरेदी करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हर्षल भणभणे म्हणाले की, सण उत्सव, संस्मरणीय प्रसंग, बर्थ डे, विवाह समारंभ अशा सर्व आनंददायी क्षणांना अविस्मरणीय करणारे कपडे तेही अतिशय रास्त दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्रीमान कलेक्शनची मुहूर्तमेढ रोवली आहे. यात आधुनिक फॅशन, स्टाईल अशा सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहकांना प्रचलित ट्रेंडसचे कपडे उपलब्ध करून दिले आहेत. खास कपडे खरेदीसाठी मोठ्या महानगरात जाण्याची गरज आता राहणार नसून श्रीमान कलेक्शनमध्येच ग्राहकांना मनपसंत व्हरायटी मिळणार आहे.
शुभारंभानिमित्त  नगरसेवक विपुल शेटिया, गणेश भोसले, प्रशांत गायकवाड, गजानन ससाणे, अनिल झोडगे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, श्याम नळकांडे, मंगल लोखंडे, संजय चोपडा, धनंजय जाधव, अनिल बोरुडे, गणेश कवडे, दत्तात्रय गायकवाड, अशोक कानडे, विजय कोथंबिरे, बंटी गुंजाळ,  मेधाताई काळे, अंकुश गायकवाड, सुमित वर्मा, ज्ञानदेव पांडुळे, प्रकाश कराळे, महादेव कराळे,अजय औसरकर आदी मान्यवरांनी श्रीमान कलेक्शनला भेट देवून भणभणे परिवाराला शुभेच्छा दिल्या. महेश भणभणे यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here