डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर

 डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर

अहमदनगर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त दि.4 फेब्रुवारी रोजी नगरमधील डॉ.गरूड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत हे शिबिर होणार असून यात रूग्णांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ.प्रकाश गरूड व डॉ.सौ.पद्मजा गरुड यांनी दिली. शहरातील नगर-मनमाड रोडवरील डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. डॉ.प्रकाश गरुड हे नामांकित कॅन्सर सर्जन असून मुंबईतील टाटा कॅन्सर हास्पिटलचाही त्यांना अनुभव आहे. त्यांनी 30 हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवीन जीवन प्रदान केले आहे. गरुड हॉस्पिटल ऍण्ड अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तत रेडिओथेरपीसह कॅन्सरचे सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत.


No comments:

Post a Comment